शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : दोन मद्यपींचा भररस्त्यात धिंगाणा; ये-जा करणाऱ्या वाहनांची कोयत्याने तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 21:45 IST

पिंपळे निलख येथे भररस्त्यात माजविली दहशत

पिंपरी : दोन दारुड्यांनी भररस्त्यात उभे राहून वाहनचालकांना शिवीगाळ केली. तसेच कोयत्याने वाहनांची तोडफोड करून दहशत माजविली. पिंपळे निलख येथे बाणेर रस्त्यावर शनिवारी रात्री ही घटना घडली. 

प्रतिक संतोष खरात, चेतन जावरे (दोघेही रा. पिंपळे निलख), अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक करून सोमवारी मोरवाडी, पिंपरी न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिंपळे निलख येथील बाणेर रस्त्यावर दहशत माजविली. ये-जा करणाऱ्या वाहनांवर कोयत्याने मारून तोडफोड केली. यात दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे नुकसान केले. काही वाहनचालकांवर कोयत्याने वार केले. मात्र यातून ते वाहनचालक बचावले. तसेच काही दुचाकीस्वारांना त्यांची दुचाकी रस्त्यावर सोडून बचावासाठी पळ काढावा लागला. हा प्रकार बघून काही वाहनचालकांनी आपली वाहने वळविली. आरोपींनी आरडाओरडा करून वाहनचालकांना शिवीगाळ केली. एका नागरिकाने मोबाइलमध्ये हा प्रकार शुट केला. मात्र याप्रकरणी कोणीही तक्रार देण्या पुढे आले नाही, असे पोलिसांनी सांगितले. 

 डोक्यात कोयता मारून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी खरात आणि जावरे या दोघांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. ४) गुन्हा दाखल केला. जितेंद्र छोटीलाल ठाकूर (वय २३, रा. पिंपळे निलख, मूळगाव खेतको, जि. गिरिडिह, झारखंड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. आरोपी हे पिंपळे निलख येथे नदीपात्राच्या कडेला नेहमी दारू पिण्यासाठी जातात. फिर्यादी हे पिंपळे निलख येथे नदीपात्रालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमधील त्यांच्या रुममध्ये जेवण बनवित होते. तेव्हा आरोपी पाणी पिण्यासाठी आले. आरोपी जावरे याने फिर्यादीकडे पैसे मागितले. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी खरात याने त्याच्या पाठीमागे कमरेला लपविलेला कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस