शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टु मारुन दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 20:12 IST

पूर्वी झालेले भांडण मिटवण्यासाठी घराबाहेर बोलवून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. १३) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव येथील हॉटेल मैफिल समोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली.

 पिंपरी : पूर्वी झालेले भांडण मिटवण्यासाठी घराबाहेर बोलवून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. १३) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव येथील हॉटेल मैफिल समोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली.    निखील अनिल चव्हाण (वय २९, रा. आदर्शनगर, नवी सांगवी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी त्याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेश माने आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी महेश आणि जखमी निखील या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. हे भांडण मिटवण्याचे नाटक करुन महेशने निखील याला शनिवारी दुपारी चारच्या सुमारास पिंपळे गुरव येथील हॉटेल मैफिल समोरील सार्वजनिक रस्त्यावर बोलवून घेतले. निखील त्या ठिकाणी आल्यानंतर त्याने ‘माझी माफी माग नाहीतर तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन’, अशी धमकी दिली. यादरम्यान महेश याच्या दोघा साथीदारांनी निखील याला पकडून ठेवले तर महेश याने सिमेंटचा गट्टू निखील याच्या डोक्यात मारुन जखमी केले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश खारगे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक