शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

Vaishnavi Hagwane case:संपूर्ण कुटुंबाला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे; वैष्णवीच्या आईची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 18:27 IST

- माझ्या लेकीचं बाळ कुठे आहे कुणाकडे आहे आम्हाला काहीच माहिती नाही. माझ्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे.

पुणे खूप आनंदाने लग्न लावून दिलं होतं. बाळ झाल्याच्या नंतर माझी लेक खूप आनंदी होती, मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी सासू आणि नणंदचे तिच्यासोबत खूप भांडण झाले. तिची नणंद करिश्मा तिला मारायची. तिच्यावर खोटेनाटे आळ लावले होते. दिराने ही त्रास दिला होता. सासरचे माझ्या लेकीला नेहमीच मानसिक त्रास द्यायचे. पैशांची मागणी करायचे. टोचून बोलायचे.  त्यामुळेच तिने टोकाचे पाऊल उचलले. माझ्या लेकीचं बाळ कुठे आहे कुणाकडे आहे आम्हाला काहीच माहिती नाही. माझ्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. संपूर्ण कुटूंबाला जन्म ठेपेची शिक्षा झाली पाहिजे. अशी मागणी वैष्णवीच्या आईने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे.  

दरम्यान, मुळशी तालुक्यातील भुकूम येथे  १६ मेला दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून क्रूर वागणूक देऊन वैष्णवी हिच्या मृत्यूस कारणीभूत झाले आहेत, अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली.

वैष्णवीच्या वडील आनंद उर्फ अनिल साहेबराव कस्पटे (५१, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी शनिवारी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वैष्णवी हिचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, नणंद करीश्मा राजेंद्र हगवणे, दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तर आज माध्यमांशी बोलतांना वैष्णवी यांच्या कुटूंबियांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले, माझी लेक वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉरच्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाचे दुस-या दिवसा पासुन शशांक व तिचे सासु सासरे यांनी घरातील किरकोळ कामाचे कारणात्सव वाद घालुन तिचे बरोबर भांडण करु लागले. याबाबत माझ्या लेकीने मला फोनव्दारे सांगितले होते. त्यावेळी मी वडील या नात्याने मुलीचा संसार टिकावा यासाठी मी माझे जावई व मुलगी यांना समज दिला. लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी जावई यांची आई लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली ती दिली नाहीत म्हणुन त्याचा राग मनात धरुन माझे मुलीस त्रास देण्यास सुरुवात केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेवून वैष्णवीला तिच्या सासऱ्याच्या लोकांनी  शारीरीक व मानसिक त्रास देणे चालू केले होते असेही सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे