शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

वाढत्या गृहप्रकल्पांमुळे मूलभूत सुविधांवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 7:17 AM

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाºया उद्योगनगरीत बांधकामांची संख्याही वेगाने वाढत आहे. महापालिका हद्दीत साडेचार लाखांहून अधिक मालमत्ता आहेत.

पिंपरी : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाºया उद्योगनगरीत बांधकामांची संख्याही वेगाने वाढत आहे. महापालिका हद्दीत साडेचार लाखांहून अधिक मालमत्ता आहेत. गेल्या वर्षापर्यंत महापालिकेने १४९९ बांधकामांना परवानगी दिली. त्यात ३३६ एकरावरील बांधकामांचा समावेश आहे. १ कोटी ४६ लाख चौरस फुटांच्या बांधकामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे मूलभूत सुविधांवर ताण येत आहे, असा निष्कर्ष पर्यावरण सद्य:स्थिती अहवालातून काढला आहे.गाव ते महानगर आणि महानगर ते स्मार्ट सिटी असा प्रगतीचा आलेख सर्वश्रुत आहे. शहराचे क्षेत्रफळ सुमारे १७७.३० चौरस किलोमीटर आहे. शहराची लोकसंख्या सुमारे २१ लाखाच्या घरात आहे. लोकसंख्येचा विचार केल्यास शहर राज्यातील पाचव्या क्रमांकावर आहे. १९८६ च्या विकास आराखड्यानुसार, शहरात ११.८२ टक्के भाग रहिवाशी, ४.९६ टक्के भाग वाहतूक क्षेत्रासाठी, तर ३०.५४ टक्के भाग वनांसाठी आरक्षित आहे. शहराच्या आजूबाजूच्या परिसरात गृहप्रकल्प, औद्योगिक वसाहतींची संख्या वाढली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे. राज्यातील दुसºया क्रमांकाचा औद्योगिक भाग पिपरी-चिंचवडमध्ये येतो. हिंजवडी आयटी पार्क, तळवडे आयटी पार्क, चाकण एमआयडीसी यामुळे शहरात वास्तव्यास येणाºयांची संख्याही मोठी आहे. दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे बांधकाम क्षेत्रात वाढ होत आहे. राज्यातून तसेच परप्रांतातून उद्योग-व्यवसायानिमित्त शहराच्या दिशेने होणारे स्थलांतर यामुळे उद्योगनगरीची लोकसंख्या वाढतच आहे. महापालिका हद्दी लगतची काही गावे समाविष्ट केल्यानंतर शहराचे क्षेत्रफळ वाढले. त्याचबरोबर शेतीचा भाग मोठ्या प्रमाणात शहरात आल्याने रिकाम्या भूखंडांची संख्याही वाढली आहे. अनेकांनी शेतजमिनी एनए(ना-शेती) करून घेतल्या आहेत.रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर वॉटर हिटर कागदोपत्रीबांधकाम परवानगी देताना ३०० चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग व चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडासाठी सोलर वॉटर हिटर बसविणे व सांडपाणी पुनर्वापर करणे बंधनकारक आहे. याशिवाय २० हजार चौरस मीटरपेक्षा जास्त बांधकाम क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांना मलशुद्धीकरण केंद्र बांधणे बंधनकारक केले आहे. बांधकाम परवानगी मिळेपर्यंत रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर वॉटर हिटर बसविण्याचे कागदोपत्री दाखविले जाते. मात्र, परवानगीनंतर संबंधित बिल्डरकडून कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत.