शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

अनधिकृत फ्लेक्सप्रकरण: प्रेमवीराला महापालिका, पोलिसांचे अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 02:00 IST

सोशल मीडियावरून नेटीझनची टीका

पिंपरी : पिंपळे सौदागर या उच्चभ्रू परिसरात ‘शिवडे आय अ‍ॅम सॉरी’ अशी फलकबाजी करून पे्रयसीची माफी मागणारा महाभाग पोलिसांना सापडला आहे. संबंधित व्यक्ती राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याने दोन दिवसांनीही पोलीस आणि महापालिकेने त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलीस महापालिकेवर जबाबदारी ढकलून मोकळे झाले, तर महापालिका अधिकारी ‘नॉट रिचेबल’ आहेत.पिंपळे सौदागर, वाकड परिसरातील शिवार गार्डन येथील बीआरटी मार्गालगत असलेल्या विजेच्या खांबांवर ‘शिवडे आय अ‍ॅम सॉरी’ असा मजकूर असलेले फलक लावल्याने शहरात खळबळ उडाली होती. सोशल मीडियावरून याचा बोभाटा झाल्याने पोलीस यंत्रणा जागी झाली आणि त्यांनी या महाभागाला शुक्रवारी शोधून काढले होते. आदित्य विकास शिंदे (वय २५, रा. केशवनगर, चिंचवड) व त्याचा मित्र नीलेश संजय खेडेकर (वय २५, रा. घोरपडे पेठ, पुणे) यांना ताब्यातही घेतले होते. प्रेयसीकडे माफी मागण्यासाठी खेडेकर यांनी शिंदेच्या माध्यमातून फ्लेक्स लावल्याची कबुली दिली होती. त्यानंतर हे दोघे राजकीय नेत्यांचे नातेवाईक असल्याने कारवाई होऊ नये म्हणून शर्थीचे प्रयत्न सुरू होते.त्यामुळे अनधिकृत फलकाबाबत कारवाई किंवा तक्रार दाखल करण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याने पोलिसांनी महापालिकेला कळविले आहे. दरम्यान, संबंधितांनी हे फ्लेक्स काढूनही घेतले. अनधिकृत फ्लेक्सची कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेकडे आहेत. त्यामुळे पोलीस महापालिकेवर जबाबदारी सोपवून मोकळे झाले. दरम्यान, महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे हे शनिवारी कार्यालयात उपस्थित नव्हते, तर शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा तीनही दिवशी संपर्क साधला, तरी त्यांनी दूरध्वनी उचलला नाही.फ्लेक्सबाबतच्या कारवाईला टाळाटाळ४‘शिवडे आय अ‍ॅम सॉरी’ या प्रेमवीराने केलेल्या फ्लेक्सबाजीवर नेटीझननी टीका केली आहे. संबंधित मुलीची बदनामी झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला आहे. हे फ्लेक्स लावण्यासाठी ७२ हजार रुपये खर्च केला असल्याचे तपासात पुढे आले आहे. एखाद्या चौकात कोणी फ्लेक्स लावला, तर अतिदक्षता दाखविणारे प्रशासन झोपले आहे का, अशी टीकाही सोशल मीडियावर होत आहे. तसेच विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांकडून पाच रुपये चौरस फूट दराने दंड आकारला जातो. त्यामुळे तीनशे फ्लेक्स लावणाºयाकडून तो वसूल करावा. महापालिका प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड