शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शालेय साहित्य खरेदीचे बेकायदा करार केले रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 14:18 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राज्य शासनाने बरखास्त केलेल्या शिक्षण मंडळाच्या २०१६-१७ च्या शालेय साहित्य खरेदीच्या कराराला बेकायदेशीर मुदतवाढ देण्याचा प्रताप सुरू आहे.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्त : नव्याने करार करा अन्यथा डीबीटीची अंमलबजावणीशालेय साहित्य खरेदी प्रकरणी सहा ठेकेदारांना निविदा रद्द करण्याविषयी नोटीस बजावली

- हणमंत पाटील-  लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेतील शिक्षण समितीचे पदाधिकारी व अधिकारी यांच्या संगनमताने शालेय साहित्य खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उजेडात आणले. त्याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जुन्या कराराला चार ते नऊ वर्षांसाठी देण्यात आलेली बेकायदेशीर मुदतवाढ रद्द करून नव्याने करार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. 

http://www.lokmat.com/pimpri-chinchwad/contractor-and-commitee-fraud-school-materials/

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राज्य शासनाने बरखास्त केलेल्या शिक्षण मंडळाच्या २०१६-१७ च्या शालेय साहित्य खरेदीच्या कराराला बेकायदेशीर मुदतवाढ देण्याचा प्रताप सुरू आहे.  ठेकेदारांना नऊ वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निविदाप्रक्रिया न राबविता स्थायी समिती, शिक्षण समिती पदाधिकाऱ्यांच्या संमतीने व शिक्षणाधिकारी यांच्या संगनमताने सुमारे २२ कोटींच्या खरेदीला मान्यता देण्यात आली असून, यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. 

http://www.lokmat.com/pimpri-chinchwad/education-officials-sanction-bills-sanctioned-5-5-lakhs/

अनियमितता असलेल्या या शालेय साहित्य खरेदी प्रकरणी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी संबंधित सहा ठेकेदारांना निविदा रद्द करण्याविषयी नोटीस बजावली आहे. ‘शालेय साहित्यांवर डल्ला’ अशी वृत्तमालिकेद्वारे हा गैरव्यवहारावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला. शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी कोट्यवधीची बिले आपल्या अधिकारात पाच-पाच लाखाने मंजूर केल्याचेही उजेडात आणले. त्यामुळे महापालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. .........‘लोकमत’ची वृत्तमालिका प्रसिद्ध झाल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शालेय साहित्य खरेदीतील गैरप्रकरणाची दखल घेत तातडीची बैठक सोमवारी घेतली. या वेळी ठेकेदारांसोबत करण्यात आलेले बेकायदेशीर ठराव रद्द करण्यात आले असून, नव्याने एक वर्षांसाठी करार करण्याचे आदेश दिले. संबंधित ठेकेदारांनी करारासाठी संमती न दर्शविल्यास बँकेत थेट लाभ हस्तांतरणाची (डीबीटी) अंमलबजावणी या वर्षापासून सुरू करणार असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. .............लोकमत’ची वृत्तमालिका प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शालेय साहित्य खरेदीतील गैरप्रकरणाची दखल घेत तातडीची बैठक घेऊन बेकायदेशीर करार रद्दचे आदेश दिले.........शिक्षण विभागाने ठेकेदारांशी शालेय साहित्य खरेदीचे केलेले चुकीचे करारनामे रद्द करण्यात आले असून, नव्याने एक वर्षांसाठी करार करण्यास सांगितले आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ठेकेदारांनी नव्याने करार करावेत. अन्यथा या वर्षांपासूनच ‘डीबीटी’ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. - श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका. ........

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाEducationशिक्षणfraudधोकेबाजीshravan hardikarश्रावण हर्डिकर