शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 10:11 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर दाखल झाले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात शिवनेरीवर त्यांचे स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे 24 आणि 25 नोव्हेंबरला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

पिंपरी चिंचवड - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर दाखल झाले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात शिवनेरीवर त्यांचे स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे 24 आणि 25 नोव्हेंबरला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी शिवनेरी गडाला भेट देण्याचे ठरवले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पदस्पर्श झालेल्या गडावरील माती घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. दरम्यान, उद्धव यांच्या अयोध्या दौ-यासाठी शिवसेना नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे, विनायक राऊत, राजन विचारे आदी नेते अयोध्येत दाखल झाले आहेत.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून घमासान सुरू आहे. राम मंदिराबाबत संवाद साधण्यासाठी उद्धव यांनी पाठवलेले निमंत्रण संत-महंतांनी धुडकावून लावले आहे. या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात रस असल्याचा आरोपही आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांनी केला.

(उद्धव ठाकरे अयोध्येत सभा घेणार नाहीत- संजय राऊत)

दरम्यान, साधू-संतांची सर्वांत मोठी संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने शिवसेनेचे निमंत्रण धुडकावून लावत प्रभू रामचंद्रांवरून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात आखाड्याशी संबंधित एकही संत सहभागी होणार नाही. या दोन्ही संघटना केवळ प्रचार आणि राजकारणासाठी अयोध्येत कार्यक्रम करत असल्याचा आरोप नरेंद्र गिरी यांनी केला.शिवसेना आणि विहिंपच्या कार्यक्रमांपासून फारकत घेत आखाडा परिषदेने २, ५ डिसेंबर रोजी स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. राम मंदिराचे सर्व पक्षकार एकाच व्यासपीठावर आले तर काहीतरी तोडगा नक्कीच निघेल, असा विश्वास नरेंद्र गिरी महाराजांनी व्यक्त केला.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने सभेला परवानगी नाकारल्याचे वृत्त फेटाळून लावत सभेसाठी परवानगीच मागितली नसल्याचा दावा शिवसेनेच्या संजय राऊत यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज