शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्ष झाली महापालिकेत काय चाललंय समजत नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 19:35 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. मात्र, सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तरे घेतली जात नाही..

ठळक मुद्देसत्ताधारी नगरसेवक आणि विरोधीपक्षाने प्रशासनाच्या कारभारावर हल्लाबोल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. मात्र, सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तरे घेतली जात नसल्याबाबत सत्तारूढ पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. दोन वर्ष काय चाललय समजत नाही. महापौर प्रश्नोत्तरे का घेत नाहीत. हा प्रश्नच आहे, आमची काही घरची कामे नाहीत, असा प्रश्न सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी थेट सभागृहात उपस्थित केला.महापालिका सभेत प्रश्नोत्तरे घेत नसल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी आवाज उठविला होता. त्यानंतर आता सत्तारूढ पक्षाच्या नगरसेवकांनीही आवाज उठविला आहे. तसेच आरोग्य आणि पाणी पुरवठा या प्रशासनाच्या कारभाराविरोधात सत्ताधारी नगरसेवकांनीही आवाज उठविला आहे. सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधीपक्षाने प्रशासनाच्या कारभारावर हल्लाबोल केला.नगरसेवक तुषार कामठे म्हणाले, पाणीपुरवठ्यावर प्रश्नोत्तरे घ्या, अशी विनंती महापौरांना केली होती. गंभीर पश्न असताना चर्चा का होत नाही. याची उकल झालेली नाही. महापौरांनी मला बोलण्याची संधी दिली. आमच्या भागात काही लोक महापालिकेचे पाणी टँकर येऊ देत नाहीत. ही बाब गंभीर आहे. चिंचवडमध्ये सर्वाधिक कामे व्हीएम मातेरेला दिली आहेत. ते महापालिकेचे जावई आहेत काय? क्षमता नसेल तर कामे देऊ नका? सभागृहात कोणते विषय आणले जातात. याबाबत आम्हाला माहिती नसते. दोन वर्ष झाली आम्हाला काय चाललय समजत नाही. प्रशासनास केवळ निविदा काढण्यातच रस आहे. आयुक्त दबावाखाली काम करीत आहेत. उपमहापौर सचिन चिंचवडे म्हणाले, शास्तीकर व्याज दरात सवलतीचे धोरण अवलंबले जात आहे. प्राधिकरण परिसरात अनधिकृत घरे अधिक प्रमाणावर आहे. ही घरे एकत्रित कुटुंबाची आहे. मिळकतकर विभागाने नोटरी वाटणीपत्र ग्राह्य धरावीत. कायदे हे लोकांच्या हितासाठी असावेत. त्यांची  गैरसोय करणारे नसावेत. कारण या भागात रजिस्टर कागदपत्रे होत नाहीत.  विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, अनधिकृत बांधकामावरील कारवाईत दुजाभाव केला जात आहे. राजकीय द्वेषातून उपमहापौरांच्या कुटुंबाचे बांधकाम पाडण्यात आले. कारवाईत कोणतेही राजकारण करू नये..............

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाGovernmentसरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना