पिंपरी : भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बेंगळुरू-मुंबई महामार्गावर वाकड येथे शुक्रवारी (दि. १८) दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला.
दत्ता गेणू दंत (वय ६४, रा. सिद्धेश्वर खुर्द, पो. पाली, ता. सुधागड, जि. रायगड), असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांची मुलगी सोनाली राकेश उफाले (वय २६, रा. सिद्धेश्वर खुर्द) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील दत्ता दंत हे दुचाकीवरून सिद्धेश्वर खुर्द येथे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी बेंगळुरू -मुंबई महामार्गावर वाकड येथे आरोपीच्या भरधाव वाहनाने दंत यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे दंत हे दुचाकीवरून खाली पडले. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर तपास करीत आहेत.