भोसरीत वेगवान दुचाकीची गाडीला धडक; दुचाकी जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 18:48 IST2017-11-30T18:45:21+5:302017-11-30T18:48:46+5:30
लांडेवाडीकडून भोसरीकडे जाणारी दुचाकी रस्त्याच्यामधील दुभाजकाला धडकून झालेल्या अपघात दुचाकी (एमएच १४ जीपी ४३६४) ही दुचाकी गाडी जळून खाक झाली.

भोसरीत वेगवान दुचाकीची गाडीला धडक; दुचाकी जळून खाक
भोसरी : लांडेवाडीकडून भोसरीकडे जाणारी दुचाकी रस्त्याच्यामधील दुभाजकाला धडकून झालेल्या अपघात दुचाकी (एमएच १४ जीपी ४३६४) ही दुचाकी गाडी जळून खाक झाली. आज सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली असून दुचाकी वरील दोघे संदेश नेहरे (वय २१) व हेमंत बोरा (वय १९, रा. शितलाबाग, भोसरी) हे गंभीर जखमी असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
लांडेवाडी पेट्रोलपंपावरून पेट्रोल भरून नाशिक रस्त्याने भोसरीकडे जात असताना पल्सरचा वेग न आवरल्याने गाडीची जोरदार धडक रस्त्याच्या मधील दुभाजकाला बसून दुसऱ्या बाजूने येत असलेल्या इंडिका गाडीखाली पल्सर घुसून पल्सरने जागीच पेट घेतला. पल्सरच्या धडकेने लोखंडी दुभाजकसुद्धा तुटून पडला. पेट घेतलेली पल्सर दोन दिवसांपूर्वी घेतली होती.