पिंपरी : रुमचा दरवाजा उघडा ठेवून झोपणे महागात पडले आहे. चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील दोन मोबाइल, लॅपटॉपवर डल्ला मारला आहे. ७० हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. हिंजवडी येथे रविवारी (दि. ३) सकाळी सव्वासहा ते साडेसहा दरम्यान हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दीपककुमार नागराज (वय २४, रा. जय मल्हारनगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी नागराज त्यांच्या घरी रविवारी सकाळी दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. त्यावेळी दोन चोरट्यांनी राहत्या रुममध्ये छुप्या मार्गाने प्रवेश केला. फिर्यादी नागराज यांचा तसेच त्यांच्या मित्राचा १० हजारांचा व २० हजारांचा असे दोन मोबाइल व ४० हजारांचा लॅपटॉप असा एकूण ७० हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
रुमचा दरवाजा उघडा ठेवून झोपणे पडले महागात; दोन मोबाइल, लॅपटॉपवर चोरट्यांनी मारला डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 12:40 IST