पिंपरी : निगडी प्राधिकरण भागात भरदिवसा घर फोडून चोरट्यांनी अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी पेठ क्रमांक २७ मध्ये घडली. विजयकुमार अनंतपूर (वय ५४, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार प्राधिकरणातील पेठ क्रमांक २७ अ मध्ये राहतात. मंगळवारी ते आपल्या सदनिकेला कुलूप लावून कामासाठी बाहेर गेले होते. दुपारच्या वेळी अज्ञात चोरट्याने सदनिकेचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटात ठेवलेले २ लाख ४९ हजार ६०० रुपयांचे दागिने घेऊन चोर फरार झाले.
निगडीत भरदिवसा घरफोडून केले अडीच लाखांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 18:44 IST