शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 04:08 IST

मुंबई-पुणे महामार्गावर सिंहगड काॅलेजजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. 

लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गावर सिंहगड काॅलेजजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. नारायण गुंड (रा. कुसगाव) व महंमद (पूर्ण न‍ाव आणि पत्ता समजू शकला नाही) यांचा अपघातात मृत्यू झाला, तर  हरिभाऊ शिवराम काळे (रा. कुसगाववाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. 

खंडाळा महामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एस. मंडले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिओ कंपनीची खाजगी प्रवासी बस मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर सर्व्हिस लेनवर उभी होती. या गाडीमधून गुंड व काळे हे चिक्कीसाठीचे सामान डिक्कीतून काढत होते व क्लिनर महंमह हा गाडीच्या उभा राहून मागून येणार्‍या गाड्यांना दिशा दाखवत होता. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने या तिघांना धडक दिली. यामध्ये महंमद याचा जागीच तर गुंड याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेला काळे याची स्थिती देखील नाजूक आहे. 

महामार्गावर वाहने उभी करण्यास मनाई असताना देखील सदर खाजगी प्रवासी वाहतूक करणारा बस चालक याने नियमांकडे दुर्लक्ष करत गाडी मार्गावर उभी करत सदरच्या दोन जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. यामुळे अज्ञात वाहनचालकासह सदरच्या बस चालकावर गुन्हा दाखल करावा, असे मंडले यांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांना कळविले आहे.

टॅग्स :Accidentअपघात