शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून दोन गटात लाथाबुक्क्या आणि दांडक्याने हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 18:01 IST

परस्पर विरोधात गुन्हा दाखल, पिंपरीच्या गिलबिलेनगरमधील घटना

ठळक मुद्देदोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना केलेल्या हाणामारीत चार जण जखमी झाले आहेत

पिंपरी: पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री गिलबिलेनगर, मोशी येथे ही घटना घडली आहे. वैजनाथ शिवाजी मांजरे, पिराजी शिवाजी मांजरे, पिराजी यल्लाप्पा मांजरे, गंगाराम शिवाजी मांजरे (सर्व रा. गिलबिलेनगर, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत कृष्णा मारुती येडके (वय १७, रा. गिलबिलेनगर, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पिराजी शिवाजी मांजरे हा येडके यांच्या घरी आला. त्यांचा भाऊ रामेश्वर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून येडके यांच्या घरातील लोकांना शिवीगाळ केली. त्यानंतर पिराजी मांजरेने याने येडके यांना घराबाहेर ओढले. त्यानंतर ते आणि त्यांचा भाऊ लखन या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर वैजनाथ याने येडके यांच्या डोक्यात दांडक्याने मारून जखमी केले.

याच्या परस्पर विरोधात वैजनाथ शिवाजी चमकुरे (वय २५, रा. गिलबिलेनगर, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामू एडके, सायबु मांजरे, कृष्णा मांजरे कुष्णा येडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांनी चमकुरे आणि त्यांच्या भावाला मारहाण केली होती. त्याबाबत आरोपींच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींनी त्यांच्या घरासमोर येऊन तक्रार मागे घेण्याची धमकी दिली. चमकुरे यांनी तक्रार मागे घेणार नसल्याचे सांगितल्यावर त्यांना आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक