शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

चोरट्यांच्या दोन टोळ्या गजाआड, १६ गुन्हे उघड, १९ लाखांचा मुद्देमाल जप्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 02:48 IST

गणेशोत्सवानिमित्त चिंचवड परिसरात गस्त घालीत असताना दुचाकीवर चाललेल्या ३ जणांना पोलिसांनी हटकले़ मात्र ते न थांबता पळून जाऊ लागले. पाठलाग करून पकडले असता उडवा उडावीची उत्तरे दिल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील वाहन चोरीचे असल्याचे उघड झाल्यावर अधिक माहिती घेतली असता त्यांनी घरफोडी, मोबाइल व वाहनचोरी केल्याचे समोर आले.

चिंचवड : गणेशोत्सवानिमित्त चिंचवड परिसरात गस्त घालीत असताना दुचाकीवर चाललेल्या ३ जणांना पोलिसांनी हटकले़ मात्र ते न थांबता पळून जाऊ लागले. पाठलाग करून पकडले असता उडवा उडावीची उत्तरे दिल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील वाहन चोरीचे असल्याचे उघड झाल्यावर अधिक माहिती घेतली असता त्यांनी घरफोडी, मोबाइल व वाहनचोरी केल्याचे समोर आले. दोन वेगवेगळ्या घटनेत चिंचवड पोलिसांनी १६ गुन्हे उघड आणून सुमारे १९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.वाल्हेकरवाडी परिसरात १३ सप्टेंबरला सहायक निरीक्षक सतीश कांबळे नाईक स्वप्निल शेलार, विजयकुमार आखाडे व इतर कर्मचारी गस्त घालत असताना त्यांनी या संशयीत वाहनाचा पाठलाग करून तिघांना पकडले. ते वाल्हेकरवाडीकडे जात होते. मात्र त्यांनी काळेवाडीला जात असल्याचे सांगितल्याने पोलिसांना संशय आला. तपासात त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. अजून एक सहभागी असल्याचे उघड झाले.सर्वांना ताब्यात घेऊन पोलिसांनी १९ तोळे सोने-चांदीचे दागिने, एक कार, ५७ हजार रोख रक्कम, एक दुचाकी, दोन मोबाइल असा १६ लाख ४३ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गणेश दगडू शिंदे (२४, रा. मुळशी), दिलीप ऊर्फ अजय दुर्गेश शिकरे (१९, रा. कामशेत), रोहिदास ऊर्फ काश्या संभाजी पवार (२४, रा. शिवणे), प्रमोद रामा क्षीरसागर (३६, रा. लोणावळा) यांना अटक केली.दुसºया घटनेत दळवीनगर रोडवर उपनिरीक्षक सुभाष डिगे, नाईक सुधाकर आवताडे, अशोक आटोळे व इतर कर्मचारी गस्त घालत असताना दुचाकीवरील नितीन हरी वेताळ (१८, रा. पर्वती पायथा, पुणे), आकाश विठ्ठल जगताप (१८, रा. निगडी) यांना तपासणीत अडविले. त्यांच्याकडे लोखंडी पाना मिळून आला. त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. अटक करून तपासात त्यांनी घरफोडी व वाहनचोरी केल्याचे निष्पन्न झाले. ५ दुचाकी एलईडी टीव्ही, लॅपटॉप, १० ग्रॅम सोन्याची अंगठी, मोबाइल असा २ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.दोन्ही टोळ्यांनी मिळून चिंचवड, वाकड, हिंजवडी, पिंपरी, सांगवी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, पौड या भागांत १६ गुन्हे केल्याचे समोर आले. या गुन्ह्यांमध्ये १९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात चिंचवड पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलीस उप आयुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक एस़ डिगे, अशोक आटोळे, स्वप्निल शेलार, सुधाकर आवताडे, विजयकुमार आखाडे, चंद्रकांत गडदे, ऋषीकेश पाटील, राहुल मिसाळ, सचिन वरणेकर, अमोल माने, गोविंद डोके, पंकज भदाणे, नितीन राठोड, रूपाली पुरीगोसावी, कांचन घवले यांनी केली.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे