शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचे अपहरण करणाऱ्या दोन गुन्हेगारांना शिताफीने अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 20:18 IST

तीन लाख रुपयांसाठी अपहरण करून तरुणास मारहाण करून सोडून देण्यात आले होते. चिंचवड येथे गुरुवारी (दि. १८) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला होता.

पिंपरी : तीन लाख रुपयांसाठी अपहरण करून तरुणास मारहाण करून सोडून देण्यात आले होते. चिंचवड येथे गुरुवारी (दि. १८) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला होता. या प्रकरणी  अपहरण करणाऱ्या  दोन गुन्हेगारांना शिताफीने अटक केली आहे. चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत महादेव कांबळे (वय २७,रा. लिंक रोड), अभिजीत राजेंद्र इंगवले (वय २४, रा. बौध्दनगर, पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. तर यशवंत ताडीवाल व एक अनोळखी चारचाकी मोटार चालक अद्याप फरार आहेत. ओंकार ज्ञानदेव वटाणे (वय २४, रा. चिंचवड) यांना काही एक कारण न सांगता ३ लाख रुपयांची मागणी करीत मारहाण करून गाडीत घालून अपहरण करून पळवून नेले होते. याबाबत वटाणे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी चंदूकांबळे व त्याचा साथीदार हॉटेल ईगल समोरील उड्डापुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला.

रात्री सव्वाआठच्या सुमारास दोन इसम उड्डापुलाखाली संशयीत दिसले. पोलिसांनी हटकताच दोघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांनाही ताब्यात घेतले. चंद्रकांत कांबळे व अभिजीत इंगवले अशी त्यांची नावे असल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. यशवंत ताडीवाल व एक अनोळखी चारचाकी चालक यांच्यासह गुन्हा केल्याचे त्यांनी चौकशी दरम्यान सांगितले. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे, सहा यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश अटवे, पोलीस हवालदार दत्ता गायकवाड, सुधाकर आवताडे, जयवंत राऊत, सचिन वर्णेकर, अमोल माने, रुपाली पुरीगोसावी यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक