शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलसमोर मोटार उभी केल्याच्या कारणावरून दोघांना लोखंडी रॉडने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 16:34 IST

हाॅटेलसमाेर चारचाकी उभी करण्याच्या वादावरुन कारचालकासह त्याच्या मित्रांना वाकड येथे मारहान करण्यात आली आहे. शुल्लक कारणावरुन हाणामारीच्या घटना पिंपरी चिंचवडमध्ये सातत्याने घडत आहेत.

पिंपरी : हॉटेलसमोर मोटार उभी केल्याच्या कारणावरून मोटारचालकासह त्याच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना वाकड येथील हॉटेल लिवॉर्ड समोर शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. 

ओंकार पांडुरंग पाटील (वय २७, रा. कोस्टलाईन हॉटेलजवळ, पिंपळे सौदागर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी हॉटेल लिवॉर्डचा मालक व तीन कामगार (नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी ओंकार पाटील हे त्यांचे मित्र अझर बाबासाहेब मुलानी (रा. कर्वेनगर) यांच्यासह जेवणाच्या बिलाचे पैसे देण्यासाठी लिवॉर्ड हॉटेलसमोरील पानटपरीसमोर त्यांची (एमएच १६, एटी ४११७) या क्रमांकाची मोटार उभी करून एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. दरम्यान, हॉटेलसमोर मोटार उभी केल्याच्या कारणावरून हॉटेलचा मालक व तीन कामगारांनी फिर्यादी पाटील यांच्या हातावर व पाठीवर लोखंडी रॉडने व काठीने मारहाण केली. तर पाटील यांच्या मित्राच्या डोक्यात रॉड मारून गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करून मोटारीची काच फोडून नुकसान केले. या वेळी पाटील यांची दीड तोळ्याची सोनसाखळी गहाळ झाली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस