शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

चालक शौचास गेल्यानंतर चोरट्यांनी पळविला ट्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 19:25 IST

वाहनचोरट्यांनी पोलिसांना गुंगारा देत धुमाकूळ घातला..

ठळक मुद्देफिर्यादी यांच्या मालकीचा सहा लाख रुपये किमतीचा 14 टायरचा ट्रक केला गायब

पिंपरी : शहरात वाहनचोरट्यांचा सुळसुळाट आहे. वाहनचोरीचे प्रकार रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. त्यामुळे पोलिसांकडून उपाययोजना देखील करण्यात येत आहेत. मात्र तरीही वाहनचोरट्यांनी पोलिसांना गुंगारा देत धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने चोरीचे प्रकार सातत्याने वाढत असतानाच आता अवजड वाहन असलेल्या ट्रक ट्रेलरला चोरट्यांनी पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

बहालसिंग मेजरसिग बल (वय 50, रा. कळंबोली, पनवेल, जि. रायगड) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बल यांच्या मालकीचा सहा लाख रुपये किमतीचा 14 टायरचा ट्रक ट्रेलर घेऊन चालक सोहनलाल शर्मा हा मंगळवारी (दि. 14) पुण्यातून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी झोप आली म्हणून सोमाटणे (ता. मावळ) गावच्या हद्दीत एका पेट्रोलपंपसमोर त्याने ट्रक ट्रेलर थांबविला. झोपला असताना त्याच्या पोटात कळ आल्याने पहाटे साडेतीनच्या सुमारास चालक शर्मा शौचास गेला. त्यावेळी त्यावेळी अज्ञात चोरट्योन त्यांचा सहा लाखांचा ट्रक ट्रेलर चोरून नेला. परत आल्यानंतर शर्मा याला ट्रक ट्रेलर दिसून आला नाही. त्यामुळे त्याने शोधाशोध केली. तसेच ट्रक ट्रेलरचे मालक फिर्यादी बल यांना याबाबत फोनवरून माहिती दिली. त्यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक बाजगिरे तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtheftचोरीPoliceपोलिस