पिंपरी महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या खात्यांतर्गत बदल्या; आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा आदेश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 16:17 IST2020-05-13T16:16:48+5:302020-05-13T16:17:23+5:30
शहर अभियंता, दोन सहशहर अभियंता, आठ कार्यकारी अभियंत्यांना बढती

पिंपरी महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या खात्यांतर्गत बदल्या; आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा आदेश जारी
पिंपरी : महापालिकेत शहर अभियंता, दोन सहशहर अभियंता, आठ कार्यकारी अभियंत्यांना बढती दिली आहे, तसेच खात्यांतर्गत बदल्या केल्या आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी आदेश जारी केला आहे.
महापालिका शहर अभियंतापदावर राजन पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे स्थापत्य मुख्यालय, अ,ब,क,ई,फ, आणि ग क्षेत्रीय कार्यालयांबरोबरच उद्यान स्थापत्य विभागाचा ,कनिष्ठ अभियता ते शहर अभियंता असा प्रवास करणारे राजन पाटील यांनी विविध विभागात प्रदीर्घ काम केले आहे. श्रीकांत सवणे आणि रामदास तांबे यांना सहशहर अभियंता पदावर बढती देण्यात आली आहे. सवणे यांच्याकडे बीआरटीएससह विशेष प्रकल्प तर तांबे यांच्याकडे पाणीपुरवठा - जलनिस्सा:रण विभाग, पर्यावरण विभाग सोपवण्यिात आला आहे.
याखेरिज, विजयकुमार काळे, शिरीष पोरेडी, अजय सुर्यवंशी, सुनील भागवानी, सुनील वाघुंडे, अनिल शिंदे, आबासाहेब ढवळे, रामनाथ टकले यांना कार्यकारी अभियंता पदावर बढती देण्यात आली आहे. तसेच, त्यांना नव्याने नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. याचबरोबर कार्यकारी अभियंता पी.आर.पुजारी यांच्याकडे पंतप्रधान आवास योजना, डी.आर जुंधारे यांच्याकडे पाणीपुरवठा विभाग, पी.पी.पाटील यांच्याकडे ब क्षेत्रीय स्थापत्य विभाग, एस.एन.इंगळे यांच्याकडे बीआरटीएस विभाग आणि पी.एस.ओंभासे यांच्याकडे बीआरटीएस परिवहन कक्ष या विभागाची जबाबदारी नव्याने सोपविण्यात आली आहे.