शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मौजमजेसाठी तब्बल ११ दुचाकी चोरांना मुद्देमालासह अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 20:43 IST

दुचाकी विक्रीतून येणारा पैसा ते मौजमजेसाठी खर्च करत असत. मौजमजेसाठी पैसे मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी चोरीचा मार्ग अवलंबला होता.

ठळक मुद्दे ११ दुचाकींपैकी ५ दुचाकी वाकड पोलीस ठाण्याच्या आणि  ६ हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरल्याची कबुली

पिंपरी : दुचाकी चोरून कवडीमोल किंमतीला विक्री करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या. मौजमजेसाठी दुचाकींची चोरी करीत असल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. याप्रकरणी अरबाज बशीर शेख (वय २१, रा गहूंजे) याच्यासह दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत चतुः श्रुंगी विभागाचे सहायक आयुक्त कल्याणराव विधाते यांनी पत्रकार परिषदेत दुचाकी चोरट्यांवरील कारवाईची माहिती दिली. तपास पथकाचे उपनिरीक्षक हरीश माने हे हद्दीत कर्मचाऱ्यांसह गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार धनराज किरनाळे यांना वाकड हिंजवडी हद्दीत दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार मुंबई बंगळूर महामार्गावर थांबल्याची माहिती मिळाली. तेथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्याने ११ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.    अरबाज शेख याने १५ आणि १६ वर्ष वयाच्या दोघा अल्पवयीन मुलांना दुचाकी चोरीसाठी बरोबर घेतले होते. एकप्रकारे त्यांना दुचाकी चोरण्याचे त्याने प्रशिक्षण दिले होते. बनावट चावी किंवा हँडल लॉक तोडून दुचाकी पळपुन नेली जात असे. चोरलेल्या दुचाकी या तिघांनी वाई, सातारा, आणि पुणे जिह्यातील ग्रामीण भागात कवडीमोल भावात विक्री केल्या. दुचाकी विक्रीतून येणारा पैसा ते मौजमजेसाठी खर्च करत असत. मौजमजेसाठी पैसे मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी चोरीचा मार्ग अवलंबला होता. ११ दुचाकींपैकी ५ दुचाकी वाकड पोलीस ठाण्याच्या आणि  ६ हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरल्याची कबुली त्यांनी दिली.  सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरीश माने, धनराज किरनाळे, दादा पवार, बिभीषण कण्हेरकर, बापू धुमाळ, अशोक  दुधवणे, विक्रांत गायकवाड व मधुकर चव्हाण यांच्या पथकाने केली

टॅग्स :wakadवाकडCrimeगुन्हाArrestअटकPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलरtheftचोरी