शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

चक्क शौचालय गेले चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 3:25 AM

पूर्वी विहीर चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाल्याची चर्चा झाली होती. त्याच पद्धतीने ताथवडे येथील चक्क शौचालय चोरीला गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड - पूर्वी विहीर चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाल्याची चर्चा झाली होती. त्याच पद्धतीने ताथवडे येथील चक्क शौचालय चोरीला गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक योगेश बबन फल्ले (वय ३३, रा. रामनगर, रहाटणी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, ‘स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत महापालिकेने मुंबई-बंगळूर महामार्गावर ताथवडे येथील चौकात सेवा रस्त्याच्या दुतर्फा ११ नोव्हेंबर २०१७ रोजी १५ लाख रुपये खर्चून लोखंडी ट्रॉलीत प्रत्येकी पाच फिरती शौचालये उभी केली होती. या शौचालयाचा वापर अनेक नागरिक करीत होते.दरम्यान, ११ एप्रिल रोजी आरोग्य विभागाचे कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेले असता ट्रॉलीसह शौचालय गायब असल्याचे समोर आले. याबाबत कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कळविल्यानंतर शौचालयाचा शोध घेण्यात आला. मात्र, शोध लागत नसल्याने पोलिसांची मदत घेतली. मात्र, शौचालयाचा ठावठिकाणा मिळाला नाही. अखेर सोमवारी येथील शौचालय चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस दफ्तरी या ट्रॉलीसह शौचालयाची किंमत दीड लाख नोंदविली आहे.ंसहा महिन्यांपूर्वी स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत हे फिरते शौचालय ताथवडे येथे बसविण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात ते गायब असल्याचे कर्मचाºयांच्या लक्षात आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. प्रयत्न करूनही ते मिळून न आल्याने अखेर फिर्याद देण्यात आली.- योगेश फल्ले, आरोग्य निरीक्षक

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या