‘लोकमत’तर्फे आज बालनाट्याची मेजवानी

By Admin | Updated: May 9, 2017 03:42 IST2017-05-09T03:42:21+5:302017-05-09T03:42:21+5:30

लोकमत बाल विकास मंच आणि संजय घोडावत ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दोन अंकी बालनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Today's Ballet Festival by Lokmat | ‘लोकमत’तर्फे आज बालनाट्याची मेजवानी

‘लोकमत’तर्फे आज बालनाट्याची मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : लोकमत बाल विकास मंच आणि संजय घोडावत ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दोन अंकी बालनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आजोबांच्या धमाल गोष्टी’ या नाटकाचा प्रयोग चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात मंगळवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
लहान मुलांना अभिनयाची आवड असते. अनेक पालकांना आपल्या पाल्याने अभिनय करावा, असे वाटत असते. हिच आवड जोपासण्यासाठी आणि मुलांमध्ये नाटकाविषयी आवड व्हावी, यासाठीच नाट्यसंस्कार कला अकादमी निर्मित ‘आजोबांच्या धमाल गोष्टी’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. बाल विकास मंच आणि सखी मंचाच्या सभासद मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी खुला प्रवेश असणार आहे. प्रथम येणारास प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाईल. या नाटकाची संकल्पना प्रकाश पारखी यांची आहे. लेखन राजश्री राजवाडे-काळे यांनी केले असून अमोल जाधव यांनी दिग्दर्शन केले आहे.

Web Title: Today's Ballet Festival by Lokmat