शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 02:28 IST

नागरिकांना करावी लागते भटकंती; महापालिकेचे दुर्लक्ष

रावेत : यंदा पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली असे बोलले जात होते. मात्र महापालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी रावेतकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. यामुळे ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी स्थितीरावेतच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये आहे.रावेत येथील गावठाण, प्राधिकरण सेक्टर २९, ३२ जाधव वस्ती, शिंदे वस्ती, भोंडवेनगर आदी परिसरासह पाणीपुरवठा होणाºया भागात पाणी कमी दाबाने आणि अपुºया प्रमाणात येत असल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांवर पाण्याचे विघ्न ओढवले आहे. काही दिवसांपासून सातत्याने विस्कळीत होणाºया पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.रावेत परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. गेल्या काही दिवसांपर्यंत नियमितपणे सर्वांना पुरेल एवढे पाणी नळास येत होते; परंतु मागील काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने आणि अपुरा पुरवठा होत आहे.काही भागात पुरेसा, तर काही भागात अपुºया दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे.काही भागात अत्यंत कमी पाणी येत असल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे. काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे नागरिकांना दुरून पाणी आणावे लागत आहे. प्रभाग १६ मध्ये दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. नेहमीच्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचे विशेषत: महिलांचे हाल होत आहेत. पिण्यासाठी व दररोजच्या वापरासाठी लागणारे पाणी या भागातील नागरिकांना मिळत नाही.गेल्या आठ-दहा दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वाल्हेकरवाडी आणि परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत व पूर्ण दाबाने चालू करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला, तर कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा या भागातील महिलांनी दिला आहे.योग्य नियोजनाचा अभावपाणीपुरवठा ही तातडिक सेवा आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांच्या बजेटसह महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. शहरात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार रावेत येथील बंधाºयातून दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा केला जातो. मात्र त्याचे वितरण करताना योग्य नियोजन केले जात नसल्याने सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.कमी दाबाने पाणीपुरवठारावेतच्या प्राधिकरण सेक्टर २९, ३२ मधील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यामुळे साथीच्या आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. अर्ध्या तासासाठी पाणी सोडले जाते. पाण्याचा दाब कमी असतो. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे नागरिक सांगतात.रावेतसह प्रभागातील अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क झाला नाही. पाणीपुरवठा तातडीची सेवा असताना अधिकारी त्यांचा फोन बंद ठेवतात. याबाबत आयुक्तांकडे लेखी तक्रार करणार आहे. परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास शहराला रावेत येथून होणारा पाणीपुरवठा बंद करून पूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत करण्यात येईल.- मोरेश्वर भोंडवे, नगरसेवकमहापालिकेकडून शहरातील सर्वच भागांमध्ये नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. कमी किंवा अनियमित पाणीपुरवठा नाही. काही भागातील जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. त्या बदलण्याचे काम सुरू आहे. अशा जलवाहिन्यांमुळे गळती होते. त्यामुळे गढूळ पाणीपुरवठा झाल्यास नागरिकांनी त्वरित माहिती द्यावी. त्याबाबत महापालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना त्वरित करण्यात येतील.- रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater scarcityपाणी टंचाई