शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत नगरसेवकाने पालिकेच्या अधिकाऱ्याला फासले काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 21:15 IST

गेल्या वर्षभरापासून शहरातील अनियमित आणि अपुऱ्या पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वारंवार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, बैठका घेतल्या. मात्र, केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळाली.

ठळक मुद्देप्रभाग क्रमांक १४ मध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी टंचाई असल्याची नागरिकांची तक्रार . पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन

पिंपरी : शहरातील अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठयामुळे विविध भागातील नागरिक हैराण झाले आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी टंचाई असल्याची नागरिकांची तक्रार आहे. दत्तवाडी, विठठलवाडी, श्रीकृष्ण नगर, ओटो स्कीम, मोहननगर, काळभोरनगर या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत महापालिकेत बैठकही झाली. मात्र, पाणीप्रश्न सुटलेला नाही. या नागरिकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त नागरिकांसह नगरसेवक जावेद शेख यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला काळे फासले. आज सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास आकुर्डीत मोठ्याप्रमाणावर नागरिक जमले होते. त्यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सुशिलकुमार लवटे आणि अन्य सहकारी उपस्थित होते. त्यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. आमच्याच भागात पाणी प्रश्न का? असा प्रश्नही उपस्थित केला. त्यावेळी अण्णा कुऱ्हाडे ,सय्यद इखलास, प्रकाश परदेशी, तोहित शेख, वसंत सोनार, हरिभाऊ हांडे, बयाजी तोरणे आदी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. महिलाही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. त्यावेळी अधिकाऱ्यांनी तुमच्या परिसरातला पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आणखी कालखंड लागेल असे सांगितले.कितीतरी दिवसांपासून हा प्रश्न जर प्रलंबित आहे. तो सोडविण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करत तुमच्याकडून दरवेळी उडवाउडवीची कसे दिली जात असल्याचे सांगत अधिकाऱ्याला नगरसेवक शेख यांनी काळे फासले. याबाबत शेख म्हणाले, दत्तवाडी, विठठलवाडी, श्रीकृष्ण नगर, ओटो स्कीम, मोहननगर, काळभोरनगर या भागात गेल्या वर्षभरापासून पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वारंवार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, बैठका घेतल्या. मात्र, केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळाली. आठ दिवसात काम होईल, अजून दोन दिवस द्या, अशी आश्वासने अनेकदा दिली. मात्र, पुढे काहीच झाले नाही. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी वेळ मारून नेत आहेत. महापालिकेचा कर नियमित भरूनही पाणी मिळत नाही. हा अन्याय आहे. अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बैठका घेऊनही काहीही सुधारणा होत नव्हती. दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे नागरिकांचे पाणी हक्काचे आहे. हा मुलभूत अधिकार आहे. नाईलाज झाल्याने आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले. पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास यापुढे आंदोलन तीव्र केले जाईल. याची दखल महापालिकेने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी. या भागातील पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करावा.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीEmployeeकर्मचारी