सांगवी, देहूरोड, चाकणमध्ये तीन वाहनांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 19:49 IST2019-12-25T19:48:10+5:302019-12-25T19:49:06+5:30

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सांगवी, देहूरोड आणि चाकण परिसरातून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हे दाखल केले आहेत.

three vehicles lost in Sangavi, Dehrood, Chakan | सांगवी, देहूरोड, चाकणमध्ये तीन वाहनांची चोरी

सांगवी, देहूरोड, चाकणमध्ये तीन वाहनांची चोरी

पिंपरी  : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सांगवी, देहूरोड आणि चाकण परिसरातून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हे दाखल केले आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक यादव (वय २९, रा. पिंपळे - गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक यांनी त्यांची ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी १७ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. चोरट्यांनी पार्किंगमधून दुचाकी चोरून नेली. सुधीर बाजीराव नवगिरे (वय ३६, रा. शिंदे वस्ती, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुधीर यांनी त्यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी घरासमोर उभी केली होती. हँडल लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. संजय श्रीपती दास (वय ४२, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीसात फिर्याद दिली आहे. संजय यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. चोरट्यांनी दुचाकी लांबवली.

Web Title: three vehicles lost in Sangavi, Dehrood, Chakan