शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे शहरातील अनधिकृत टपऱ्या, हातगाड्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 17:57 IST

देहू - आळंदी रस्त्यावरील आठवडे बाजार

ठळक मुद्दे महापालिका व पोलिसांच्या पथकाची संयुक्त कारवाई

पिंपरी : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे शहरातील अनधिकृत टपऱ्या, हातगाड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याअंतर्गत गुरुवारी (दि. २) देहू-आळंदी रस्त्यावर आठवडे बाजारात कारवाई झाली. तीन पत्राशेड हटवून दोन टेम्पो, चार हातगाड्या, तीन टपऱ्या यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले. रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडील भाजीपाला जप्त करण्यात आला. महापालिकेचे कर्मचारी तो भाजीपाला मोशी येथील कचरा डेपोत घेऊन गेले. देहू-आळंदी रस्त्यावर डायमंड चौक, मोइ फाटा ते टाळ चौक, पाटील नगर येथे कारवाई झाली. महापालिकेचे प्रभारी प्रशासन अधिकारी सुरेश कोंढरे यांनी याबाबत माहिती दिली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक नीलिमा जाधव, पोलीस निरीक्षक (नियोजन) प्रसाद गोकुळे, पोलीस निरीक्षक दिलीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली. चार हातगाड्या, तीन लोखंडी टपऱ्या, सहा लोखंडी काऊंटर, आठ लाकडी काऊंटर, २८ प्लॅस्टिक क्रेट, आठ लोखंडी खाटा, दोन टेम्पो, एक लोखंडी कमान, पाच स्टीलचे पाईप, दोन लोखंडी बाके, चार लाकडी स्टँड, दोन लोखंडी बोर्ड, दोन लोखंडी स्टँड, तीन पोते कपडे, दोन पोती बेडशीट, तीन पोते स्वेटर, एक पोते कापडी पिशव्या तसेच एक पोते इतर साहित्य यावेळी जप्त करण्यात आले. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक क्रमांक तीनचे अधिकारी- कर्मचारी, स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्या, हातगाड्यांवर महापालिका व पोलिसांकडून संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यांतर्गत गुरुवारी देहू-आळंदी रस्त्यावरील आठवडे बाजारात ही कारवाई झाली. यापुढेही अशी कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी किंवा कोणीही वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.- प्रसाद गोकुळे, पोलीस निरीक्षक (नियोजन), वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :dehuदेहूEnchroachmentअतिक्रमणPoliceपोलिस