दुचाकीच्या धडकेत तीन जण जखमी
By Admin | Updated: October 13, 2016 01:44 IST2016-10-13T01:44:42+5:302016-10-13T01:44:42+5:30
घोरवडेश्वर डोंगरपायथ्याजवळील शेलारवाडी येथे भरधाव वेगातील दुचाकीची दुभाजक ओलांडणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात

दुचाकीच्या धडकेत तीन जण जखमी
देहूरोड : घोरवडेश्वर डोंगरपायथ्याजवळील शेलारवाडी येथे भरधाव वेगातील दुचाकीची दुभाजक ओलांडणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास झाला.
प्रदीप भूषण पवार (वय २४), प्रदीप वसंत दलाल (वय २४, दोघे रा. लोणी काळभोर), संगप्पा मरिअप्पा साखरे (वय ४०, पत्ता समजू शकला नाही) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई- पुणे महामार्गावर घोरवडेश्वर डोंगरपायथ्याजवळील शेलारवाडी येथील अमरदेवी मंदिरासमोर मंगळवारी दुपारी अडीचच्या भरधाव वेगातील दुचाकीची दुभाजक ओलांडून जाणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून, जखमींवर सोमाटणे फाटा (मावळ) येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)
करारनामा तोडून दिली माहिती
पुणे : राजीनामा देताना केलेल्या कराराचा भंग करून कंपनीची माहिती स्पर्धक कंपनीला देऊन विश्वासघात केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी नितीन दामोदर कोठारी (वय ५६, रा़ एरंडवणे) याला अटक केली. त्याला न्यालयाने जामीन मंजूर केला.
याप्रकरणी अविनाश शंकर जोशी (वय ४८, रा़ साधू वासवानी रोड) यांनी फिर्याद दिली आहे़ ही घटना मे ते १५ आॅगस्ट २०१६दरम्यान अॅक्वाफार्म केमिकल्स कंपनीच्या कार्यालयात घडली़ कोठारी यांनी मे २०१६मध्ये राजीनामा दिला़ त्या वेळी कंपनीने त्यांना एक वर्ष मटेरियलशी संदर्भात कोणास माहिती द्यायची नाही, अशी अट घालून तसा करारनामा करून राजीनामा मंजूर केला होता़ १५ आॅगस्ट रोजी कोठारी यांनी ई-मेल पाठविल्याची माहिती
कंपनीला उघड झाली़ त्यामुळे कंपनीसोबत केलेल्या करारातील कलमाचा भंग झाला.(प्रतिनिधी)