शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

द्रुतगतीवर तीन ठार, बोरजजवळील घटना: बसला ट्रकची धडक, सात जखमी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 02:57 IST

मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर बोरज गावाजवळ नादुस्त झालेल्या एका खासगी प्रवासी बसला मागून भरधाव आलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवासी ठार आणि सात जण जखमी झाले.

लोणावळा : मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर बोरज गावाजवळ नादुस्त झालेल्या एका खासगी प्रवासी बसला मागून भरधाव आलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवासी ठार आणि सात जण जखमी झाले. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व प्रवासी दिवाळी सुट्टीनिमित्त मुंबईहून गावी चालले होते.साहिल श्रीपती पवार (वय १६), तानाजी पांडुरंग नाईकवाडे (वय ३५), उमेश आबा नाईकवाडे (वय २२, सर्व रा. ठाणे; मूळ चरणगाव, ता. शिराळा, जि. सांगली).मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस (एमएच ४३ एन ३५३८) प्रवासी घेऊन दिवाळी सुटी व ग्रामपंचायत मतदानासाठी गावी निघाले होते. कामशेत बोगद्यापूर्वी असलेल्या बोरज गावाजवळ बसचा क्लच खराब झाल्याने चालकाने बस साइड लेनवर थांबवली होती. त्या वेळी वेगाने मागून आलेल्या ट्रकने (टीएन ८८ - ८८०४) बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये ट्रकचालक आहुल बाबू (वय ३८, रा चेन्नई) जखमी झाला असून, त्याच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अपघातानंतर आयआरबीच्या पथकाने सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत अपघातग्रस्त वाहने रस्त्यामधून बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.उपचार सुरू : जखमींमध्ये बालकाचा समावेशजखमींमधील दिनेश किसन कोळसे (वय २८) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. श्रीपती गणपत पवार (वय ४०), प्रवीण काशिनाथ नाईकवडे (वय २४), हिंदूराव दगडू नाईकवडे (वय ४८), प्रथमेश सुभाष शिंदे (वय १४), बाबाजी पांडुरंग नाईकवडे (वय ४२, सर्व सध्या रा. ठाणे, मूळ चरण, शिराळा, जि. सांगली) यांचा जखमीत समावेश आहे.

टॅग्स :Accidentअपघात