बाँबसदृश वस्तूच्या स्फोटात देहूरोड परिसरात तिघे जखमी

By Admin | Updated: April 12, 2017 04:27 IST2017-04-12T04:27:27+5:302017-04-12T04:27:27+5:30

येथील नायडूनगर (झेंडेमळा) येथे भंगार माल समजून बॉम्बसदृश वस्तू घरात आणून फोडताना झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

Three injured in Dehurod area in bomb blast case | बाँबसदृश वस्तूच्या स्फोटात देहूरोड परिसरात तिघे जखमी

बाँबसदृश वस्तूच्या स्फोटात देहूरोड परिसरात तिघे जखमी

देहूरोड : येथील नायडूनगर (झेंडेमळा) येथे भंगार माल समजून बॉम्बसदृश वस्तू घरात आणून फोडताना झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात कोणतीच माहिती मिळू शकलेली नाही.
बाला महेंद्र बिडलान (वय ४०), राजकुमार महेंद्र बिडलान (वय २५) आणि पूजा महेंद्र बिडलान (वय २०) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड हद्दीतील वॉर्ड क्रमांक सातमधील झेंडेमळा येथील नायडूनगर
येथे भंगार वेचून आणताना बिडलान कुटुंबीयांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास भंगार फोडताना बॉम्बसदृश गोळा फोडताना स्फोट झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Three injured in Dehurod area in bomb blast case