शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून ७० हजारांच्या तीन दुचाकींची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 18:18 IST

वाहनचोरीच्या घटनांनी पिंपरी चिंचवडकर त्रस्त

ठळक मुद्देवाहनचोरीचे सत्र सुरूच : विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

पिंपरी : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच आहे. ७० हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत रविवारी (दि. ८) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीचोरीचा पहिला प्रकार भोसरी येथे दि. ४ आॅक्टोबर रोजी दुपारी पावणेएक ते रात्री साडेबारा दरम्यान घडला. याप्रकरणी सुनील रामराव पनबोने (वय ३८, रा. भारतमाता नगर, दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. फियार्दी सुनील यांनी त्यांची १० हजार रुपये किमतीची दुचाकी भोसरी येथे पुलाखाली पार्क केली होती. चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.दुचाकी चोरीचा दुसरा प्रकार शाहुनगर, चिंचवड येथे दि. ३० नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ ते १ डिसेंबर रोजी सकाळी सातच्या दरम्यान घडला. याप्रकरणी मालाजी सजेर्राव निंबाळकर (वय ५४, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फियार्दी निंबाळकर यांनी त्यांची १० हजार रुपये किमतीची दुचाकी शाहुनगर येथे लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.दुचाकी चोरीचा तिसरा प्रकार जुनी सांगवी येथे शनिवारी (दि. ७) रात्री साडेआठ ते रविवारी (दि. ८) सकाळी साडेआठच्या दरम्यान घडला. याप्रकरणी सुनील बबन हातोडे (वय ५२, रा. कुभारवाडा, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फियार्दी हातोडे यांनी त्यांची ५० हजार रुपये किमतीची दुचाकी जुनी सागंवीतील कुंभार वाडा येथे मंदिरातील मोकळ्या जागेत लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtwo wheelerटू व्हीलरtheftचोरीThiefचोर