शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 18:58 IST

लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहे. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी : लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहे. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडून ही कारवाई करण्यात आली.  सांगवी व चाकण या दोन्ही पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे.केवा परबाराम देवासी (वय २२, रा. पिंपळे गुरव, सांगवी), किशोर भानुदास वाघमारे (वय २४, रा. दवडामळा, चाकण), अजय माताप्रसाद सागर (वय २५, रा. निघोजे, चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रन यांच्यामार्फत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो नवी दिल्ली यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या नॅशनल चाईल्ड क्राईम रेकॉर्ड ब्युरो मुंबई (एनसीसीआरपी) यांच्याकडे लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अहवाल सादर करण्यात आले होते.

त्यानुसार, एनसीसीआरपीने पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे याबाबतच्या लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाल्याच्या ३१ टिपलाइन पाठवल्या होत्या. त्यातील १४ टिपलाइनची पिंपरी-चिंचवड सायबर सेलने तपासणी करत १२ गुन्ह्यांची विविध पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. सायबर सेलकडून तांत्रिक विश्लेषण करून तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. आरोपी केवा, किशोर आणि अजय या तिघांनी सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी केवा याला सांगवी तर अन्य दोन आरोपींना चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गरुड, पोलीस कर्मचारी अतुल लोखंडे, भास्कर भारती, नितेश बिच्चेवार, मनोज राठोड, पोपट हुलगे, प्रदीप गायकवाड, विशाल गायकवाड, युवराज माने, कृष्णा गवळी, वैशाली बर्गे, स्वप्नाली जेधे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :ArrestअटकPOCSO Actपॉक्सो कायदाCrime Newsगुन्हेगारी