शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकी; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 13:18 IST

तू मला खूप आवडतेस, असे म्हणून आरोपीने फिर्यादीचा विनयभंग ....

पिंपरी : ऑफिसमध्ये एकट्या असलेल्या महिलेसोबत गैरवर्तन करून विनयभंग केला. तसेच महिलेचा पाठलाग केला. रिलेशन न ठेवल्यास चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकीही दिली. तसेच याबाबत कोणाला सांगितले तर कंपनीमध्ये फ्राॅड केल्याची खोटी केस करून अडकवीन, अशीही धमकी दिली.

पीडित महिलेने याप्रकरणी बुधवारी (दि. १५) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संजय उत्तम राठोड (रा. चिखली, प्राधिकरण) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ऑफिसमध्ये एकटीच असताना आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केले. तू मला खूप आवडतेस, असे म्हणून आरोपीने फिर्यादीचा विनयभंग केला. फिर्यादी महिलेने विरोध केला. याबाबत कोणाला सांगितले तर कंपनीत फ्रॉड केल्याची खोटी केस करून अडकवीन, अशी धमकी आरोपीने दिली.

आरोपीने फिर्यादी महिलेचा पाठलाग केला. तू मला खूप आवडतेस, तू माझ्यासोबत रिलेशन ठेवले नाहीस, तर मी तुला रस्त्यामध्ये गाठून तुझ्या तोंडावर ॲसिड फेकीन, अशी धमकी दिली. त्यासोबतच वेळोवेळी फिर्यादी यांचा पाठलाग केला. हा प्रकार २८ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या साधारण १० ते १२ दिवसांपूर्वी तसेच १३ फेब्रुवारी २०२३ रोजी चिखली येथे घडला, असे फिर्यादीत नमूद आहे. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी