शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad: पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका; तरुणाचा नियंत्रण कक्षाला ‘काॅल’, पोलीस दलात खळबळ

By नारायण बडगुजर | Updated: September 26, 2024 17:42 IST

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचवा..., त्यांना मदत करा’’, असा कॉल तरुणाने आपत्कालीन नियंत्रण कक्षाला केला होता

पिंपरी : पुण्यात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याबाबतचा काॅल आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडे आला. त्यानंतर राज्य पोलिस दलात एकच खळबळ उडाली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांतच संबंधित अभियंता तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी पुणे दौरा नियोजित होता. मेट्रोसह १२ प्रकल्पांचे लोकार्पण व भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार होते. मात्र, पावसामुळे माेदी यांचा गुरुवारचा पुणे दौरा रद्द झाला. दरम्यान, गुरुवारी (दि. २६) सकाळी एका अभियंता तरुणाने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचवा..., त्यांना मदत करा’’, असा कॉल आपत्कालीन नियंत्रण कक्षाला केला. त्यानंतर राज्य पोलिस दलात एकच खळबळ उडाली. 

अभियंता तरुण पिंपरी -चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील थेरगाव परिसरात असल्याची माहिती तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांना मिळाली. त्यानुसार, वाकड पोलिसांनी शोध सुरू केला. बसच्या प्रतीक्षेत बसथांब्यावर थांबलेल्या संबंधित अभियंता तरुणाला वाकड पोलिसांनी काही मिनिटांतच ताब्यात घेतले. तरुण मूळचा उदगीर येथील असून तो थेरगाव येथे त्याच्या मित्राकडे आला होता. अभियंता तरुणाने असा कॉल का केला. तसेच, त्याच्याकडे नेमकी काय माहिती आहे, याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांसह राज्य दहशतवाद विरोधी पथकाने देखील या कॉलची गंभीर दखल घेतली असून त्यांच्याकडून देखील समांतर चौकशी सुरू आहे.

हाॅलीवूड चित्रपट, ‘एआय’मुळे केला काॅल?

संबंधित २५ वर्षीय अभियंता तरुण हा हाॅलीवूड चित्रपट तसेच एआयवर आधारित व्हिडिओ सोशल मीडियावर पाहतो. तसेच पंतप्रधान मोदी हे नुकतेच पाश्चिमात्य देशांमध्ये दौऱ्यावर होते. त्यात त्यांनी सोशल मीडिया आणि ‘एआय’बाबत वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्या जिवाला धोका असल्याचे वाटले. त्यामुळे काॅल केला, असे प्राथमिक तपासा दरम्यान संबंधित तरुणाने सांगितल्याचे समोर आले आहे. मात्र, अद्यापही याप्रकरणी कसून चौकशी सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसNarendra Modiनरेंद्र मोदीSocialसामाजिकMobileमोबाइलcommissionerआयुक्तBJPभाजपा