शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

‘शहरीकरणास आव्हान न समजता संधी समजा’ - रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 03:23 IST

वाढते नागरीकरण हे प्रगतीचे द्योतक असून, शहरीकरणास आव्हान न समजता संधी समजावे. तळेगावचा विकास करताना राजकारणास फाटा देत कोट्यवधी रुपयांची बचत केली असली, तरी चांगली आस्थापना असल्याशिवाय

तळेगाव दाभाडे : वाढते नागरीकरण हे प्रगतीचे द्योतक असून, शहरीकरणास आव्हान न समजता संधी समजावे. तळेगावचा विकास करताना राजकारणास फाटा देत कोट्यवधी रुपयांची बचत केली असली, तरी चांगली आस्थापना असल्याशिवाय विकास करणे शक्य नाही. त्यासाठी नगरपालिकेतील रिक्त ४५ जागांसह प्रलंबित विकासकामांना लवकर मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात आमदार बाळा भेगडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांची बैठक घेतली जाईल, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास व गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. त्यांच्या हस्ते शहरातील सुमारे ३० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन झाले. त्या वेळी झालेल्या समारंभात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबर भेगडे होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, पक्षप्रतोद सुशील सैंदाणे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शहर भाजपाचे अध्यक्ष संतोष दाभाडे-पाटील, जनसेवा विकास समितीचे संस्थापक बाळासाहेब काकडे, निमंत्रक चंद्रभान खळदे, ज्येष्ठ नगरसेविका सुलोचना आवारे, उद्योजक किशोर आवारे, नगरसेवक अरुण भेगडे-पाटील, गणेश खांडगे, अमोल शेटे, किशोर भेगडे, संग्राम काकडे, नीता काळोखे, मुख्याधिकारी वैभव आवारे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर, गणेश भेगडे, रवींद्र आवारे आदी उपस्थित होते.यावेळी आमदार बाळा भेगडे म्हणाले,‘‘राज्यातील पहिली ग्रीनसिटी करण्याचा मान केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांनी तळेगावला दिला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची तळेगावला दत्तक घेण्याची अपूर्ण राहिलेली इच्छा राज्यमंत्री रणजित पाटील यांनी पूर्ण करावी. प्रास्ताविक उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी केले. बांधकाम समितीचे सभापती अरुण भेगडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन शिक्षण समिती सभापती संग्राम काकडे यांनी केले. (वा. प्र.)वतननगरजवळील रेल्वे अंडरग्राउंड बायपासच्या भूमिपूजनासह जिजामाता चौकातील व्यापारी संकुलाचे भूमिपूजन, एक्स्प्रेस फीडरचे लोकार्पण, भुयारी गटर, तसेच कचरा डेपो रस्ता आणि एलईडी दिव्यांच्या कामाचा शुभारंभ राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार