शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

कार्ला येथील एकविरा देवीचा कळस चोरणारे चोरटे गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 17:43 IST

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या सदरच्या मंदिराच्या कळसाची चोरी करणार्‍यांचा शोध घेण्याचे मोठे आवाहन पोलीस यंत्रणेसमोर उभे होते.

ठळक मुद्देग्रामस्थ व ट्रस्ट असा वाद विकोपाला गेल्याने कळसाचे राजकारण

लोणावळा : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरावरील कळस चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार ३ आँक्टोबर २०१७ रोजी पहाटेच्या सुमारास घडला होता. तब्बल ७ महिन्यांनंतर आरोपींना पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरणारे चोरटे गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करत अहमदनगर येथून दोघा जणांना ताब्यात घेतले होते. राहुल भागवत गावंडे व सोमनाथ अशोक गावंडे ( रा. धामणगाव आवारी , ता. अकोले ,जि. अहमदनगर )असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा मुलामा असलेला हा कळस होता. सुमारे १ लाख २५ हजार रुपये किंमतीचा हा कळस एका भक्ताने देवीला अर्पण केला होता.मात्र, एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरीला गेल्यानंतर देवस्थानमध्ये मोठा गदारोळ झाला होता. ग्रामस्थ व ट्रस्ट असा वाद विकोपाला गेल्याने कळसाचे राजकारण झाले होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या सदरच्या मंदिराच्या कळसाची चोरी करणार्‍यांचा शोध घेण्याचे मोठे आवाहन पोलीस यंत्रणेसमोर उभे होते. मध्यंतरी हा तपास सीबीआयकडे देखील देण्यात आला होता. सध्या एलसीबीच्या पोलीस निरीक्षक पदावर असलेले पद्माकर घनवट यांनी पदभार स्विकारताच या घटनेचा छडा लावण्याचा चंग बांधला होता. त्याप्रकरणाचा तपास करत असताना नगर जिल्ह्यातील दोन जणांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी कळस चोरीची कबुली दिली. मंगळवारी (दि. ७ मे ) सकाळी एलसीबी पथकाने स्थानिक ग्रामस्त व पोलीस मित्र यांना सोबत घेत एकविरा देवीच्या डोंगरात शोध घेत चोरट्यांनी लपविलेला कळस हस्तगत केला. याप्रकरणाची माहिती देण्याकरिता पुणे ग्रामीण कार्यालयाच्या कृष्णा सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.चोरटे हे ठाकर समाजाचे  असून एक जण सेंटरिंगचे काम करतो तर दुसरा शेती काम करतो. ते दोघे आळंदी येथे आले असता त्यांनी यु ट्युब वर एकविरा देवीचे गाणे पाहिले होते. या गाण्यात देवीचा कळस सोन्याचा दिसत असल्याने त्यांनी कळस चोरीचा चंग बांधला. त्यानुसार ३ आँक्टोबर रोजी कळसाची चोरी केली. मंदिराचा पठारावर बसून त्यांनी कळस घासला असता तो सोन्याचा नसून धातूचा असल्याचे समजल्याने त्यांनी कळस चोरून न नेत तेथेच डोंगराच्या एका नाल्यात लपवून ठेवला व पुन्हा गड उतरुन ते निघून गेले अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. 

पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्याकडून गुन्ह्याचा तपास पूर्ण केल्याबद्दल गौरव करण्यात आला असून या पथकाला ३५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरू, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे, शरद कांबळे, सचिन गायकवाड, गणेश महाडीक,  रऊफ इनामदार, चंद्रशेखर मगर, अक्षय जाबळे  यांनी केला. 

टॅग्स :karlaकार्लाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस