शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घरातून मोबाईल लंपास करणारा चोरटा ‘जाळ्यात’; सव्वातीन लाखांचे ३१ मोबाईल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 12:27 IST

लोकांच्या घरातून चोरलेल्या या मोबाईलचा आरोपीने स्वत:ही वापर केला

पिंपरी : चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या अट्टल गुन्हेगारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून तीन लाख २० हजार रुपये किमतीचे ३१ मोबाईल हस्तगत केले. निगडी पोलिसांनी ही कारवाई केली. लोकांच्या घरातून चोरलेल्या या मोबाईलचा आरोपीने स्वत:ही वापर केला. त्यामुळे आरोपीपर्यंत पोहचण्यास पोलिसांना मदत झाली. 

दत्ता संतोष धोत्रे (वय २०, रा. ओटास्कीम, निगडी), असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीचे मोबाईल विक्रीसाठी एकजण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. धोत्रे हा ट्रान्सपोर्टनगर भागामध्ये मोबाईल फोन विक्री करण्यासाठी आला. पोलिसांना संशय आला. त्यावेळी त्याला पोलीस पकडत असताना  तो पळून जात होता. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. त्याच्याकडे चार मोबाईल फोन मिळून आले. तसेच त्याने निगडी, महाळुंगे, तळवडे तसेच पिंपरी -चिंचवड पुणे परिसरात रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या घरातून मोबाईल फोन चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. चोरीचे मोबाईल फोन त्याच्या तोंडओळखीचा हर्षीत शामनारायण सिंह (वय २२, रा. महाळुंगे ता. खेड, मूळगाव सिध्दीकला, ता. रावसंगज, जि. सोनभद्र, उत्तरप्रदेश) याला विकले असल्याचे धोत्रे याने सांगितले. हर्षीत सिंह याचा महाळुंगे परीसरात शोध घेऊन त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सिंह याच्याकडे चोरीचे दोन मोबाईल फोन मिळून आले. 

धोत्रे याने चोरी करून लपवून ठेवलेले १५ मोबाईल फोन जप्त केले. तसेच हर्षीत हा दत्ता धोत्रे याच्याकडून चोरीचे मोबाईल घेऊन तो त्याच्या गावी उत्तरप्रदेश येथे पाठवित असल्याचे हर्षित याने पोलिसांना सांगितले. धोत्रे याने हर्षित याला विकलेले १० मोबाईल फोन त्याच्याकडून हस्तगत केले. आरोपी हे चोरीचे मोबाईल स्वत: देखील वापरत होते.  निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल कोरडे, पोलीस कर्मचारी सुधाकर अवताडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकMobileमोबाइल