शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाढवळया घरफोडी करणारे चोरटे जाळयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:58 IST

पुणे, पिंपरी चिंचवड शहरात चोरी कलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने चोरट्यांनी उत्तरप्रदेशमधील  त्रिकुट येथील सराफाला विकले आहेत.

ठळक मुद्देसहा लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त सांगवी परिसरात त्यांनी दिवसाढवळ्या तब्बल नऊ घरफोड्या

पिंपरी : पॅन्टमध्ये कटावणी अडकवुन फिरत असताना बंद सदनिका दिसुन येताच त्या ठिकाणी दिवसाढवळया चोऱ्या करायच्या अशी गुन्ह्याची विशिष्ट पद्धती (मोडस आॅपरेंडी) अवलंबलेले दोन चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसुन आल्याने त्यांना जेरबंद करता आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह २१४.५ ग्रॅम वजनाचे सुमारे सहा लाख ७० हजार रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत १८ घरफोड्या केल्या असून त्यातील १२ गुन्हे उघडकीस आले आहेत,अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या घरफोडीच्या घडणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी ज्या परिसरात घरफोड्या झाल्या. त्या ठिकाणी गस्त वाढवली. तेथून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ११ आॅगस्टला सांगवीतील चंद्रहिरा सोसायटीच्या आवारात झालेल्या घरफोडीच्या अनुषंगाने तपास केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.त्यावेळी चोरटे त्यात कैद झाल्याचे निदशर््नास आले. शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या रविकरण माताबदल यादव (वय २२) आणि अनुपम नरेंद्र त्रिपाठी (वय २४,रा. मोरया पार्क गल्ली ) या दोन चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी केली असता, सांगवी, भोसरी, कोथरूड, कोंंढवा या ठिकाणी त्यांनी १८ घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यातील १२ गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून ६ लाख ७० हजार ५०० रुपए किंमतीचे २१४.५ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले. त्यांनी विमाननगर, कोथरूड आणि हिंजवडी परिसरात केलेल्या चोरीच्या चार गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे. अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, परिमंडल दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे,पोलीस उपनिरीक्षक संदीप बागूल तसेच अरूण नरळे आणि शिमोन चांदेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.उत्तर प्रदेशात दागिन्यांची विक्रीपुणे, पिंपरी चिंचवड शहरात चोरी कलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने चोरट्यांनी उत्तरप्रदेशमधील  त्रिकुट येथील सराफाला विकले आहेत. दोघेही आरोपी मुळचे उत्तरप्रदेशचे आहेत. आरोपी त्रिपाठी रियल इस्टेटचा व्यवसाय करीत असे. तर रविकिरण यादव याचे बाणेर येथे दुचाकी दुरूस्तीचे गॅरेज आहे. सांगवी परिसरात त्यांनी दिवसाढवळ्या तब्बल नऊ घरफोड्या केल्या आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangviसांगवीPoliceपोलिसtheftचोरीArrestअटक