शहरं
Join us  
Trending Stories
1
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
2
बांगलादेशात युनूस सरकार मावळणार, संध्याकाळी मोठी घोषणा होणार; संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं
3
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
4
'त्यांचे हाथ थरथरत होते, दडपणाखाली होते'; राहुल गांधी अमित शाहांच्या लोकसभेतील भाषणावर आता काय बोलले?
5
लग्नाआधीच मुलगी गरोदर; आईला कळताच तिच्या प्रियकराला घरी बोलवलं अन् मग...शेवट भयंकर!
6
आम्हाला तर पाकिस्तान सोबत येणे शक्य, पण हे दोन देश...; नव्या समूहासंदर्भात काय म्हणाला बांगलादेश
7
'स्वाभिमानाने जगणारा कोकणातला शेतकरी आज चिंतेत', वलसाड हापूसवरून भास्कर जाधव आक्रमक
8
व्हॉट्सअ‍ॅपवरची एक चूक थेट घेऊन जाऊ शकते तुरुंगात! 'ही' गोष्ट करताना किमान दहा वेळ विचार कराच
9
पाकिस्तानमध्ये कधी येणार? 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये आलिया भटला चाहत्याचा प्रश्न; म्हणाली...
10
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन, म्हणाला- "माझ्या पत्नीला..."
11
धक्कादायक! दारुच्या नशेत होता बोगस डॉक्टर; YouTube पाहून ऑपरेशन, चुकीची नस कापली अन्...
12
Gold Silver Price Today: यावर्षी सोनं ₹५२,७९५ आणि चांदी ₹१००९३६ रुपयांनी महागली; आजही दरानं तोडले सर्व विक्रम, पाहा किंमत
13
पुढील वर्षात १ तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? ब्रोकरेज फर्मने सांगितला मोठा आकडा
14
लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
15
व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री...
16
Geminid Meteor Shower: १३,१४ डिसेंबर ठरणार इच्छापूर्तीची रात्र; आकाशाकडे बघून करा 'हे' काम!
17
'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय
18
माइंडमेश समिट २०२५: विद्या-कला-नीती पुरस्कारांची घोषणा; समाजाला आकार देणाऱ्यांचा सन्मान
19
३ महिन्यांतच गमावलेलं दुसरं बाळ, पहिल्यांदाच व्यक्त झाली सुनीता अहुजा, म्हणाली- "तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा..."
Daily Top 2Weekly Top 5

त्यांचे कुत्र्यांवर प्रेम! पण माणसांवर नाही, सगळ्या कुत्र्यांना या प्राणी मित्रांच्या घरी सोडा - महेश लांडगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:13 IST

पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात 8 हजारांहून अधिक तर पुणे परिसरात तीन वर्षांत 1 लाखांपेक्षा जास्त नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत

पुणे: पुण्यात दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या नागरिकांना, लहान मुलांना, ज्येष्ठांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. रस्त्याने सहज जाताना ही कुत्री थेट अंगावर धावून चावा घेत आहेत. अनेकांना दुचाकीवरून जाताना कुत्री मागे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे अपघातही झाले आहेत. भोसरीचे आमदारमहेश लांडगे यांनी अधिवेशनात हा मुद्दा मांडत प्राणी मित्रांवर निशाणा साधला आहे. सर्व मोकाट कुत्री या प्राणी मित्रांच्या घरी सोडा असं म्हणत लांडगे आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. 

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1155398876574874/}}}}

लांडगे म्हणाले, कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना असुरक्षित वाटू लागले आहे. काही प्राणी मित्र असे आहेत कि, माणसांना काय त्रास होतो हे त्यांना दिसत नाही. त्यांचे कुत्र्यांवर प्रेम आहे. पण ती ज्या माणसांना चावतात त्यांच्यावर यांचे प्रेम नाही. आणि जे प्राणीमित्र आहेत त्यांच्या घरी एक पण कुत्र नाही. मी मंत्र्यांच्या माध्यमातून त्यांना सांगतो की, सगळी कुत्री त्या प्राणी मित्रांच्या घरी सोडा. त्यांना कळूदे कुत्र्यांचा चावा काय असतो. आपल्या पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यात तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद चिंताजनकरीत्या वाढला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षभरात 8 हजारांहून अधिक तर पुणे परिसरात तीन वर्षांत 1 लाखांपेक्षा जास्त नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ठोस उपाययोजना होत नाहीत. मोकाट कुत्र्यांवर कारवाई केल्यास प्राणीमित्र संघटना गोंधळ घालतात, पण जखमी नागरिकांच्या वेदनांकडे कोण लक्ष देणार? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सूचना दिल्या असून शासनाने तातडीने कठोर धोरण राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधिवेशनात सांगितले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : MLA Demands Stray Dogs Be Sent to Animal Lovers' Homes

Web Summary : MLA Mahesh Landge criticizes animal lovers, demanding stray dogs be sent to their homes due to increasing dog attacks in Pune and Pimpri-Chinchwad. He highlights rising cases and lack of action from local bodies.
टॅग्स :Puneपुणेmahesh landgeमहेश लांडगेbhosari-acभोसरीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनPoliticsराजकारणdogकुत्रा