शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पुणे जिल्ह्याचे विभाजन नाहीच..! अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 6, 2025 18:54 IST

ज्याचे क्रेडिट त्याला द्यायला शिका : महेश लांडगेंना सुनावले

- ज्ञानेश्वर भंडारेपिंपरी : ‘‘कुणीतरी अफवा उठवतो, २६ जानेवारीला २१ जिल्हे जाहीर केले जाणार... मात्र, आता एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही. आता जे चाललेय ते चांगले चाललेले आहे. ज्यावेळेस वाटेल, त्यावेळेस सरकार निर्णय घेईल. आतातरी कोणताच जिल्हा निर्माण करण्यात येणार नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्याचेही विभाजन होणार नाही,’’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा विभाजनाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (दि.६) चिखलीतील जाधववाडी येथे झाले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.तत्पूर्वी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाषणात पुणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यास नवीन जिल्ह्यास ‘शिवनेरी’ नाव द्यावे, भविष्याचा विचार करता पिंपरी-चिंचवड शहरासाठी नवीन जलस्रोत निर्माण करावेत, अशा मागण्या केल्या. तोच धागा पकडून पवार म्हणाले की, आतातरी कोणताच जिल्हा निर्माण करण्यात येणार नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्याचेही विभाजन होणार नाही. २०५४ ला पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या पुण्यापेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. सध्याच्या पाण्याचा पुरवठा कमी पडणार आहे. भविष्याचा विचार करता शेजारील टाटांच्या धरणातील पाणी घ्यावे लागेल. समुद्राचे पाणी प्रक्रिया करून पिण्यासाठी वापरता येईल का, असाही विचार सुरू आहे.

ज्याचे क्रेडिट त्याला द्यायला शिका : महेश लांडगेंना सुनावले

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय उभारणीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे विधान आ. महेश लांडगे यांनी केल्यानंतर पवार यांनी सुनावले की, महेश लांडगे यांना माझे नाव घ्यायला का वाईट वाटले, हे मला माहीत नाही. परंतु, अख्ख्या पिंपरी-चिंचवडला माहीत आहे की, १९९२ला मी तुमचा खासदार झालो. १९९२ ते २०१७ पर्यंत कोणी पिंपरी-चिंचवड सुधारणा केल्या? आज २५ वर्षे झाली. प्रत्येक गोष्ट मी पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष देऊन करत असतो. येथील अधिकाऱ्यांना विचारा, या इमारतींमध्ये मी किती वेळा येतो, किती वेळा चौकशी करतो आणि किती वेळा बसतो. शेवटी आपण महायुतीमध्ये आहोत. एवढाही कंजूषपणा दाखवू नका, मी दिलदार आहे. ज्याने केले, त्याला त्याचे क्रेडिट देत असतो. ज्याने चांगले काम केले आहे, त्याला चांगले म्हणायला शिका.

माझे जरी अनधिकृत होर्डिंग असले तरी काढा : फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यासह विविध शहरांमध्ये अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्जचे प्रमाण वाढले आहे. त्यावर उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून सुरू केलेला होर्डिंग्जचा शोध आणि सर्वेक्षण प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे अनधिकृत होर्डिंगवर सहज कारवाई करणे शक्य होणार आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंग कोणाचेही असो काढून टाका, त्यावर माझा फोटो अथवा नाव असले तरीही कारवाई थांबवू नका!

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारmahesh landgeमहेश लांडगेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस