शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
3
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
4
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
5
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
6
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
7
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
8
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
10
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
11
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
12
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
13
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
14
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
15
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
16
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
17
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
18
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
19
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
20
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?

शाही चोराच्या मुसक्या आवळल्या : विमानाने येऊन मारायचा डल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 21:02 IST

आरोपीकडून २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा आठ लाखांचा ऐवज जप्त केला. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली. 

पिंपरी : उत्तरप्रदेशातून थेट विमानाने पुण्याला यायचे, पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये रहायचे. मात्र, पुणे मुक्कामी असाताना घरफोड्या करायच्या, अशा शाही थाटात चोऱ्या करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आरोपीकडून २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा आठ लाखांचा ऐवज जप्त केला. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल मिश्री राजमर (वय ३६, रा. बोदरी, जि. जोनपूर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 २२ जुलै रोजी माऊली रेसिडेन्सी येथे एका फ्लॅटमध्ये चोरी झाली. चोरट्याने नऊ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा ऐवज चोरून नेला. त्यानंतर २५ जुलै रोजी थेरगाव येथील ओशियन मिडोज सोसायटी येथे आणखी एक फ्लॅट फोडल्याची घटना घडली. यामध्ये चोरट्याने १३४ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. तीन दिवसांमध्ये दोन घरफोड्या झाल्या. यामध्ये चोरट्यांनी २५ तोळ्यांचे दागिने चोरून नेले. वाकड पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तीन पथकांनी तपास सुरु केला. एका नामांकित हॉटेलमधील वेटरने एका इसमाची संशयास्पद हालचाल असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी आरोपीची माहिती काढली. त्यानंतर आरोपी अनिल याला उत्तर प्रदेश मधील जैनपूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता त्याने हे दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केले. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला याप्रकरणी दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

आरोपीकडून पोलिसांनी २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा आठ लाखांचा ऐवज जप्त केला. आरोपी अनिल सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी मुंबईमधील वाळीव पोलिस ठाण्यात तीन आणि पुणे येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एक असे एकूण चार घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अनिल उत्तर प्रदेशमधून विमानाने पुण्यात येऊन नामांकित हॉटेलमध्ये राहत असे. दरम्यान, या काळात तो आसपासच्या परिसरातील बंद फ्लॅटची पाहणी करून दिवसा घरफोडी करीत असे. चोरलेल्या सोन्याची विल्हेवाट तो शहरातच लावायचा. त्यानंतर पुन्हा विमानाने गावी जात होता.

टॅग्स :RobberyचोरीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी