शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देहूत बोट क्लबच्या तरूणांनी वाचविले दोन विद्यार्थ्यांचे जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 17:09 IST

वाचविल्यानंतर या दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले आहे....

देहूगाव (पुणे) : येथील इंद्रायणी नदी पात्रात शनिवारी( दि. ३०) दुपारी सव्वा एकच्या सुमारास बुडणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना गजराज बोटिंग क्लबच्या दोन तरूणांनी प्राण वाचविले. वाचविल्यानंतर या दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले आहे.

येथे देहूतील संत तुकाराम विद्यालयाच्या वतीने पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 वी जयंती निमित्त शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा समारंभ संपल्यानंतर विद्यालयातील इयत्ता नववीत शिकत असलेले लोकेश भूल, देवकुमार शाहू, तुषार शिंदे, अख्तर मुस्तफा रज्जाक (वय १६ सर्व रा. विठ्ठलवाडी, देहू ) आणि विक्रम उदयशंकर सिंग (वय १३ रा. येलवाड़ी) असे पाच जण इंद्रायणी नदी घाटावर पोहण्यासाठी गेले होते. सध्या इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. असे असतानाही  यापैकी विक्रम सिंग आणि अख्तर रज्जाक यांना पोहता येत नसतानाही पाण्यात पोहण्यास उतरले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात खेचले गेले आणि बुडू लागले.

नुकत्याच सुरू असलेल्या पावसामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढलेली असून पाण्याचा प्रवाह जोरात आहे. बुडणाऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी ओरडाओरड केले असता लगतच असणाऱ्या गजानन काळोखे यांच्या गजराज बोटिंग क्लबवरील रमेश पवार आणि देवेंद्र गाडे यांनी तातडीने बोट बुडणाऱ्या दोघांजवळ घेऊन त्यांनी या दोघांचे जीव वाचविले. दोघांना बोटीत घेऊन किनाऱ्यावर आणले. दोघांकडून त्यांच्या पालकांची माहिती घेऊन त्यांना बोलावून पालकांच्या स्वाधीन केले. गजराज बोट क्लबच्या चालक गजानन काळोखे व कर्मचाऱ्यांनी आत्ता पर्यत अनेकांचे जीव वाचविले असून आज दोघांचे जीव वाचविल्याने त्यांचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. सोबत फोटो पाठवित आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdehuदेहू