शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा दौरा आला अन् पिंपरी चिंचवडचे खड्डे बुजवायला मुहूर्त सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 15:29 IST

पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय

पिंपरी : पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. शहरातील खड्डे बुजविल्याचा दावा महापालिका प्रशासन करीत आहेत. मात्र, शहरातील उपनगर आणि मुख्य रस्त्यांवरील खड्डयांमधून प्रवास करावा लागत आहे. शुक्रवारी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे चिंचवड परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बजुविण्यास मुहूर्त सापडला आहे. काल सायंकाळपर्यंत खड्डे बुजविण्यात आले.  पिंपरी-चिंचवड शहरात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. नव्याने तयार केलेले डांबरी रस्ते अक्षरश: वाहून गेल्याचे दिसून आले आहे. खड्डे बुजविल्याचा दावा महापालिका प्रशासन करीत असले तरी वास्तव निराळेच आहे.  उपनगरातील रस्ते दयनीय आहेत.

मुख्यमंत्री शिंदे हे पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात सकाळी कार्यक्रम झाला आहे. त्यामुळे चिंचवड स्टेशन ते नाट्यगृहे आणि नाट्यगृहे ते चिंचवड गावात आणि पुण्याला जाण्याच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम केले जात होते. काही ठिकाणी डांबर टाकून तर काही ठिकाणी सिमेंटचे ब्लॉक टाकून खडडे बुजविण्याचे काम सुरू होते.

खड्ड्यांच्या दुरुस्तीवर प्रशासनाने लाखो रुपये खर्च करीत आहेत. आता पुन्हा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.  खड्डे पडलेले रस्ते बनवणारे ठेकेदार, अधिकारी, सल्लागार व गुणवत्ता नियंत्रण एजन्सी यांच्या संगनमताच्या भ्रष्टाचारामुळेच शहरवासीयांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील ज्या रस्त्यांवर खड्डे पडलेत त्या रस्त्यांच्या कामाची आपण चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

''मुख्यमंत्री ज्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. म्हणून महापालिकेने खड्डे बुजविले असतील, तर चुकीची बाब आहे. शहरातील सर्वच खड्डे बुजवायला हवेत. आणि मंत्री येणार असतील आणि खड्डे बुजविले जाणार असतील तर शहरात दौरे व्हायला हवेत. - मारूती भापकर (सामाजिक कार्यकर्ते )'' 

खड्ड्यांची आकडेवारी

एकूण खड्डे - ८४६डांबराने भरले खड्डे - २३८बीबीएमने भरले खड्डे - ५३डब्ल्यूएमएमने भरले खड्डे - ३९७पेव्हिंग ब्लॉगने भरले खड्डे - ३२खडीमुरुमने भरले खड्डे - १२६

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणChief Ministerमुख्यमंत्रीSocialसामाजिक