मंदिरातून गणपतीच्या चांदीच्या मोदकाची चोरी; मावळ तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 21:57 IST2023-03-11T21:57:19+5:302023-03-11T21:57:30+5:30
मावळ तालुक्यातील ठाकरवस्ती येथील गणपती मंदिरात शुक्रवारी (दि. १०) पहाटे ही घटना उघडकीस आली.

मंदिरातून गणपतीच्या चांदीच्या मोदकाची चोरी; मावळ तालुक्यातील घटना
पिंपरी : मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम तसेच गणपतीचा चांदीचा मोदक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. मावळ तालुक्यातील ठाकरवस्ती येथील गणपती मंदिरात शुक्रवारी (दि. १०) पहाटे ही घटना उघडकीस आली.
संजय वासुदेव ओक (वय ६०, रा. ठाकरवस्ती, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरवस्ती येथे असलेल्या गणपती मंदिरात गुरुवारी रात्री साडेदहा ते शुक्रवारी पहाटे तीन या कालावधीत चोरी झाली.
चोरट्यांनी मंदिरातील लाकडी दान पेटीतील २५ हजार रुपये रोख रक्कम, फिर्यादी ओक यांच्या कपड्यात ठेवलेले १२ हजार ७०० रुपये रोख रक्कम, १० हजारांचा चांदीचा मोदक आणि फिर्यादी यांचा पाच हजारांचा मोबाईल फोन असा एकूण ५२ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला, असे फिर्यादीत नमूद आहे.