शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा डोंगरावरील संत तुकोबांच्या मंदिराचे वर्षभरात होणार लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:25 IST

वारकरी संप्रदायाचे स्वप्न प्रत्यक्षात होणार साकार : ट्रस्टची माहिती

पिंपरी : जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची चिंतनभूमी असणाऱ्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबारायांच्या आकाशाएवढ्या कार्याला साजेसे भव्य-दिव्य मंदिर व्हावे, हे वारकरी संप्रदायाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. मंदिराचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या वर्षभरात लोकार्पण सोहळा होईल, अशी माहिती भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद व मंदिर बांधकामाचे नियोजन करणारे गजानन शेलार यांनी दिली.

अयोध्येतील राम मंदिर ज्यांच्या स्थापत्यकलेतून उभारले गेले, ते चंद्रकांत सोमपुरा, निखिल सोमपुरा बंधू स्थापत्यविशारद म्हणून येथे कार्यरत आहेत. मंदिराच्या निर्मितीची जबाबदारी रमेशचंद्र सोमपुरा आणि परेश सोमपुरा या पिता-पुत्रांनी घेतली आहे.

संत तुकाराम महाराजांचे भव्यदिव्य मंदिरगांधीनगर (गुजरात) येथील जगप्रसिद्ध अक्षरधाम मंदिराच्या आधारावर संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे कार्य सुरू आहे. मंदिराची लांबी १७९ फूट, उंची ८७ फूट व रुंदी १९३ फूट असून, मंदिराला तीन भव्य कळस आहेत. मंदिराचा घुमट ३४ फूट बाय ३४ फूट असून, १३.५ बाय १३.५ फूट आकाराची एकूण ५ गर्भग्रहे मंदिरात असतील. मध्यभागी मुख्य जागेवर श्री विठ्ठल -रुख्मिणीची मूर्ती व भक्तीमध्ये दंग झालेल्या श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAlandiआळंदी