शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील हवेची गुणवत्ता तपासणार, प्रदूषण रोखण्यासाठी पथक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 20:36 IST

प्रदूषणाबाबत पाळत ठेवण्यासाठी पथक नेमले जाणार आहे. त्याची गस्त रात्रं-दिवस असणार आहे. 

- विश्वास मोरे पिंपरी  : पिंपरी- चिंचवड महापालिकेने शहरातील हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ प्रकल्पाची सुरुवात केली आहे. त्यातून या शहराची हवेची गुणवत्ता तपासली जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हवेच्या गुणवत्ता निरीक्षण आणि त्यावर उपाययोजनांची आखणी करण्यात येणार आहे. प्रदूषणाबाबत पाळत ठेवण्यासाठी पथक नेमले जाणार आहे. त्याची गस्त रात्रं-दिवस असणार आहे.  नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामअंतर्गत महापालिका हद्दीमध्ये हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. शहरातील हवेच्या गुणवत्तेच्या पातळीनुसार त्यावर उपाय करण्यात येणार आहेत. यामध्ये उपाययोजनांसाठी हवा गुणवत्ता निर्देशांकाचा आधार घेऊन त्याआधारे चार टप्पे केले आहेत. पर्यावरणीय प्रदूषणाचा सामना करण्यासाठी प्रदुषणाबाबत पाळत व दक्षता ठेवण्यासाठी, विविध प्रकारच्या कचरा – संबंधित व पर्यावरणीय उल्लंघनांवर नियंत्रण व गस्त घालण्यासाठी पथक निर्माण केले आहे. यामध्ये  ३९ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. 

काय आहे प्रणाली ग्रॅप प्रणालीच्या दोन, तीन व चार या टप्प्यांतर्गत सुधारित हवेच्या गुणवत्तेचा अंदाज हे सी-डॅकच्या ‘निर्णय समर्थन प्रणाली’ नुसार हवेच्या गुणवत्तेच्या अंदाजांवर तीन दिवस अगोदर सुरू केले जातील. सुचविलेले उपाय किमान १५ दिवसांसाठी किंवा हवा गुणवत्ता निर्देशांकमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येईपर्यंत लागू करण्यात येतील. महापालिका सी-डॅकच्या अंदाजानुसार, शहराच्या सर्व भागामधील पीएम २.५, पीएम १०, एनओ एक्स, एसओ एक्स सारख्या प्रदूषकांवर लक्ष केंद्रित करणार आहे. वाहनांच्या प्रदूषणाची कठोर देखरेख ठेवण्यासाठी महत्वाची यंत्रणा निर्माण केली आहे. औद्योगिक आणि बांधकाम प्रदूषणावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामध्ये ३२ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह ती आठ वॉर्डांमध्ये, उल्लंघनाच्या सदैव निरीक्षणासाठी तैनात केली आहे. काय आहेत चार टप्पे १) रस्त्यावरील धूळ नियंत्रित करणे, बेकायदेशीर कचऱ्याची विल्हेवाट लावणे, वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. २)  डिझेल जनरेटरवरील निर्बंध, रस्त्यांची स्वच्छता आणि सार्वजनिक वाहतुकीचा प्रचार यांचा समावेश आहे.३) अत्यंत प्रदूषण करणारे उद्योग बंद करण्यात येणार, वाहनांच्या प्रतिबंधात्मक क्षेत्र तयार करुन उल्लंघनावर कठोर दंड आकारण्यात येणार.४) प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहन बंदी, संभाव्य शाळा बंद आणि कडक दंड लागू करण्यात येणार.

''शहराला प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपक्रम सुरु करणे म्हणजे शहराला प्रदुषणमुक्त करण्याच्या प्रक्रियेमधील एक मैलाचा दगड आहे. प्रगत तंत्रज्ञान, वास्तविक देखरेख आणि नागरिकांचा सहभागासह आम्ही शाश्वत विकासाला चालना देत आमच्या नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचे ध्येय ठेवले आहे. ''-शेखर सिंह, आयुक्त “उपक्रमामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून वास्तविक देखरेखची अंमलबजावणी करण्यात येते. यामुळे प्रदूषण होणाऱ्या घटकांवर प्रभावीपणे कारवाई करण्यास मदत होत असून हा प्रकल्प शहराच्या शाश्वत विकासासाठी महत्वाची भूमिका पार पाडेल.''-संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpollutionप्रदूषणair pollutionवायू प्रदूषणMaharashtraमहाराष्ट्र