शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनियर पतीच्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेची सहाव्या मजल्यावरून उडी

By नारायण बडगुजर | Updated: September 17, 2023 15:10 IST

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षिकेच्या पतीवर गुन्हा दाखल

पिंपरी : पतीच्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षिकेच्या पतीवर गुन्हा दाखल केला. भोइरवाडी, माणगाव येथे गुरुवारी (दि. १४) रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली.

पुजा कुमारी (२८), असे शिक्षिकेचे नाव आहे. रामधनी प्रसाद (६२, रा. झारखंड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रकाश कुमार (रा. भोईरवाडी, माणगाव, ता. मुळशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामधनी यांची मुलगी पुजा कुमारी ही खासगी शाळेत शिक्षिका होती. तिचा पती प्रकाश कुमार हा इंजिनियर असून खासगी आयटी कंपनीत नोकरीला आहे. 

पुजा कुमारी हिला नोकरी करण्याची इच्छा असताना तिला पती प्रकाश याने जाणीवपूर्वक नोकरी सोडण्यास भाग पाडले. पुजा कुमारी नोकरी करीत असताना पती प्रकाश तिला नोकरीच्या वेळेत घरातील कामे सांगत असे. तिला व्यस्त ठेवून नोकरीवर जाण्यास अडवणूक करत असे. तिला मानसिक त्रास देऊन घालून पाडून बोलून पगारावरून अपमानित करत असे. या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घराच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी पोलिसांना सांगितले.  

पुजा कुमारी ही पती प्रकाश कुमार याच्या त्रासाला कंटाळली होती. प्रकाश कुमार याने तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले, असे रामधनी प्रसाद यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक अजित काकडे तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी