शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

पोलिसांनी सव्वातीनशे तळीरामांना आणले ताळ्यावर; थर्टी फर्स्टला तब्बल २० लाखांचा दंड वसूल

By नारायण बडगुजर | Updated: January 1, 2024 20:29 IST

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अडीच हजार पोलिस रस्त्यावर उतरले होते

पिंपरी : सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी पार्ट्यांचे नियोजन केले होते. थर्टी फर्स्ट जोरदार साजरा करत मद्यधुंदपणे वाहनचालविणाऱ्या ३२२ जणांना पोलिसांनीकारवाईचा दंडुका दाखवला. मद्यधुंद होऊन नववर्षाचे स्वागत करणाऱ्या या तळीरामांना पोलिसांनी ताळ्यावर आणले.

नववर्ष स्वागतासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. यात हाॅटेलसह माॅल, बाजारपेठेत मोठी गर्दी झाली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी रविवारी (दि. ३१) सायंकाळपासून मोठा बंदोबस्त तैनात केली होता. बंदोबस्तासाठी अडीच हजार पोलिस रस्त्यावर उतरले होते. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडून सातत्याने आढावा घेण्यात येत होता. स्थानिक पोलिस ठाणे तसेच गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून गस्त घालण्यात आली. तसेच शहरात ४० ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. नववर्षाचे स्वागत करताना रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत नियमांचे उल्लंघन करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवरही कारवाई केली.   वाहतूक पोलिसांकडून कारवाई 

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून मुख्य चौक, अंतर्गत रस्ते तसेच महामार्गांवर ठिकठिकाणी वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. यातील मद्यपी चालकांवर कारवाई केली. 

हाॅटेल, ढाब्यांची तपासणी

पोलिस आयुक्तालयांतर्गत हाॅटेल, ढाब्यांसह विविध ४७३ आस्थापनांची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

रेकाॅर्डवरी ४१५ जणांना केले ‘चेक’

पोलिस आयुक्तालयांतर्गत रेकाॅर्डवरील तसेच विविध गुन्हे दाखल असलेल्या संशयितांची तपासणी करण्यात आली. यात रविवारी रात्री ४१५ संशयितांना चेक करून आढावा घेण्यात आला. संशयित वाहनांवर ‘वाॅच’

बंदोबस्त तसेच नाकाबंदी दरम्यान संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. पोलिस आयुक्तालयांतर्गत रविवारी अशा संशयित २४२५ वाहनांची पोलिसांनी तपासणी केली. यात बेशिस्त वाहनचालकांना २० लाख ६० हजार ८०० रुपयांचा दंड आकारला.  

पोलिसांनी उधळला ‘डाव’

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जुगार अड्डा चालविण्यात येत होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून जुगाराचा डाव उधळून लावला. तसेच अवैध दारू निर्मिती व विक्री प्रकरणी देखील कारवाई केली. यात एक जुगार अड्डा तसेच अवैध दारु प्रकरणी पाच कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख नऊ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी केलेली कारवाई

ड्रंक अँड ड्राईव्ह - ३२२संशयित चेकिंग - ४१५वाहने चेकिंग - २४२५अवैध धंदे कारवाई - १०आस्थापना चेकिंग - ४७३अवैध धंदे कारवाईमधील जप्त मुद्देमाल - २०९८७५वाहनांवर केलेल्या कारवाईचे दंडाची रक्कम - २०६०८००

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस31st December party31 डिसेंबर पार्टीbikeबाईकcarकारTrafficवाहतूक कोंडी