शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो आणि अर्बन स्ट्रीटच्या कामांमुळे उद्योगनगरीत पालखीचा मार्ग खडतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:33 IST

आकुर्डीतील खंडोबा माळ ते चिंचवड स्टेशन रस्त्यावरील पालखीचा मार्गच बदलला

पिंपरी : संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरातून जात आहे. मात्र, अर्बन स्ट्रीट आणि मेट्रोच्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातही महापालिकेने तात्पुरती डागडुजी करत रस्त्यावर डांबर, तर काही ठिकाणी मुरूम टाकला होता. मात्र, पावसामुळे रस्ताच उखडला आहे. तर आकुर्डीतील खंडोबा माळ ते चिंचवड स्टेशन या रस्त्यावरील पालखीचा मार्गच बदलण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर आली आहे.

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी (दि.१९) शहरात विसावला. आज (शुक्रवारी) पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. मात्र, या मार्गावर मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातही पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पालखीच्या मार्गावर अडथळे निर्माण झाले असून वारकऱ्यांना त्रासास सामोरे जावे लागत आहे. 

महापालिकेच्या पत्राला मेट्रोकडून केराची टोपलीपिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे पालखी मार्गावरील सुरू असलेले मेट्रोचे काम थांबवावे, असे पत्र महापालिकेने महामेट्रोला दिले होते. मात्र, मेट्रोने काम सुरूच ठेवले. पालखी येण्याच्या दोन दिवस अगोदर काम बंद ठेवले. त्यामुळे त्या मार्गावर कामे करण्यास महापालिकेला वेळ मिळाला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मार्ग बदलला

खंडोबा माळ, आकुर्डी ते चिंचवड स्टेशनदरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे पालखीचा मार्ग बदलण्यात आला आहे. आकुर्डीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून पालखी मार्गस्थ झाल्यावर खंडोबा माळ येथे आल्यानंतर दरवर्षी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून जात असते. मात्र, यावर्षी तो मार्ग बदलण्यात आला असून ग्रेड सेपरेटरच्या पलीकडे असलेल्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून पुण्याकडे जाणार आहे.

अर्बन स्ट्रीटच्या कामांमुळे त्रासमहापालिकेच्या वतीने अर्बन स्ट्रीटचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खडी, गट्टू आणि इतर सामान पडलेले आहे. त्याचा वारकऱ्यांना त्रास होत आहे. रस्ता खोदून ठेवल्याने पावसाच्या पाण्याने चिखल झाल्यामुळे वारकऱ्यांना चालता येत नसल्याचे दिसत आहे.

महापालिकेने पालखी मार्गावर मूलभूत सुविधा दिल्या आहेत. रस्त्यांवरील खड्डेही बुजविण्यात आले आहेत. पावसामुळे काही ठिकाणी खडी उखडली असल्याने त्यात पाणी साचले आहे. मात्र, पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू आहे. - मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिकापालखी मार्गावरील मेट्रोची कामे थांबवली आहेत. तेथील मशिनरी व इतर साहित्यही पालखी सोहळ्याला अडथळा ठरणार नाही, असे ठेवले आहेत.- हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, पुणे मेट्रो

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र