शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाश्रमातील केअरटेकर दिवाळीपूर्वीच गावी गेला अन् चोरीचा प्रकार उघडकीस आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 18:14 IST

वृद्धाश्रमातून दागिने चोरून नेणाऱ्या केअरटेकर तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या

पिंपरी : वृद्धाश्रमातून दागिने चोरून नेणाऱ्या केअरटेकर तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून दोन लाख ३५ हजार रुपयांचे दागिने हस्तगत केले. हिंजवडी पोलिसांनी ही कामगिरी केली.  संकेत माणिकराव झाडे (वय २०, रा. सूस, ता. मुळशी, मूळ रा. खोक, ता. जिंतूर, जि. परभणी) असे अटक केलेल्या केअरटेकरचे नाव आहे. गोकर्णा बाबासाहेब बाभळकर (वय ४४, रा. सुस, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंवजडी पोलीस ठाण्यात १६ ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सूस येथे जिव्हाळा वृध्दाश्रम चालवितात. या वृद्धाश्रमात संकेत झाडे हा केअरटेकर म्हणून कामाला होता. फिर्यादीने १९ ऑगस्टला किचनमध्ये ४७ ग्रॅमचे सोन्याचे दागिने ठेवले होते.

दरम्यान, केअरटेकर झाडे हा अचानक ११ ऑक्टोबरला त्याच्या गावी गेला. त्यानंतर फिर्यादीने दिवाळीसाठी १६ ऑक्टोबरला दागिने पाहिले असता ते मिळून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी झाडे याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परभणी जिल्ह्यातील खोक येथे हिंजवडी पोलिसांचे पथक रवाना झाले. तेथून संकेत झाडे याला ताब्यात घेऊन १८ ऑक्टोबर रोजी अटक केली. चोरी गेलेल्या सोन्याच्या चार अंगठ्या, एक ब्रेसलेट व एक सोनसाखळी असे एकूण दोन लाख ३५ हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी झाडे याच्याकडून हस्तगत केले.  

पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक निरीक्षक राम गोमारे, उपनिरीक्षक रमेश पवार, पोलीस कर्मचारी स्वामिनाथ जाधव, बाळकृष्ण शिंदे, बापूसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिदे, सागर पंडीत यांनी केली आहे.  

गावी जाण्याच्या घाईने बळावला संशय

केअरटेकर झाडे हा दिवाळी झाल्यानंतर गावी जाणार होता. मात्र, तो दिवाळीपूर्वीच गावी गेला. तसेच मी परत कामावर येणार नाही, असे त्याने फिर्यादी महिलेला सांगितले होते. त्यामुळे त्याच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी झाडे याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक