शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

'कामावर वेळेत ये..' म्हटल्याच्या कारणावरून बॉसला केली बेदम मारहाण; पिंपरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:13 IST

निघोजे गावच्या हद्दीतील एका कंपनीच्या घडली घटना

पिंपरी : कंपनीतील वरिष्ठाने एका कामगाराला कामावर वेळेत ये, असे म्हटले. त्या कारणावरून कामगाराने वरिष्ठाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. २१) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास निघोजे गावच्या हद्दीतील एका कंपनीच्या समोर घडली.मयूर हनुमंत शिर्के (३०, रा. हिवरे कुंभार, ता. शिरूर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गणपत कुशाल लांडे (२६, रा. चिखली) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर शिर्के आणि गणपत लांडे हे दोघे एकाच कंपनीत काम करतात.फिर्यादी शिर्के यांनी गणपतला फोन करून सायंकाळी सात वाजता वेळेत कामावर ये, असे सांगितले. गणपत याने आपल्याला रात्री एक वाजेल असे म्हटले. त्यामुळे तू कामावर आला नाहीस तरी चालेल, असे शिर्के यांनी सांगितले. त्या कारणावरून गणपत लांडे याने शिर्के यांना कंपनीच्या गेटवर अडवून बेदम मारहाण केली. ‘तुला जिवंत सोडणार नाही. तुझ्यावर व कंपनीवर खोट्या केस करतो’ अशी गणपत लांडे याने धमकी दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस